आंदोलन प्रकरणात २२ प्रमुखांसह २५0 आंदोलकांवर गुन्हा दाखल

0
20

गोरेगाव,दि.20ः-१४ ऑक्टोबर रोजी सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या आदित्या गौतम याच्या पार्थिवावर उपचार करून जीवंत असल्याचा दावा करणार्‍या बालाघाट जिल्ह्यातील डॉ. नवीन लिल्हारे व त्याच्या चमूला पोलिसांनी अटक केली. या प्रकाराला संतापून काल (ता.१६) गोरेगाव येथे तिव्र आंदोलन करण्यात आले. दरम्यान दगडफेक करून एस.टी. नुकसानही करण्यात आले. या प्रकरणाला घेऊन गोरेगाव पोलिस ठाण्यात २२ प्रमुख आरोपींसह २00 ते २५0 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्याच्या पार्थिवावर उपचार करण्यासाठी आलेले डॉ. नवीन लिल्हारे व त्यांचे सहकारी बुनेश लिल्हारे, डॉ. इंद्रकुमार बघेले यांना अटक करण्यात आली. यावर काल (ता.१६) गोरेगाव व घोटी गावात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करून तनावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान मुख्य मार्गावर टायर जाळपोळ करून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
ऐवढेच नव्हेतर पोलिसांवर दगळ फेक करण्यात आली. यामध्ये एक युवक जखमी झाला. तसेच एसटी बसचे काच फोडण्यात आले. या प्रकरणात गोरेगाव पोलिसांनी मुख्य आरोपींसह काही जणांना अटक केली आहे. तसेच २00 ते २५0 आंदोलकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.