अपघातात एक ठार; दोन युवती गंभीर

0
15

एटापल्ली,दि.20ःःतालुका मुख्यालयी आयोजित दसरा महोत्सव पाहून आपल्या गावाकडे परत जाणार्या चारचाकी वाहनाने दुचाकीस्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघात एकजण जागीच ठार तर दोन युवती गंभीर जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एटापल्ली जवळील पेपरमिल कार्यालया जवळ घडली. अर्जुन मालू तलांडे (२२) रा. मरकल असे मृतकाचे नाव आहे. वनिता मैनू कलमोटी, निकीता साधू गुम्मा अशी गंभीर जखमी झालेल्या युवतींचे नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी दसर्‍याचे औचित्य साधून एटापल्ली येथे दसरा महोतस्वाचे आयोजन करण्यात आले होते. सदर महोसत्व पाहण्यासाठी मरकल येथील अर्जुन व दोन युवती दुचाकीने एटापल्ली येथे आले होते. महोत्सव पाहूण झाल्यानंतर ते गावाकडे परत जात होते. दरम्यान आलापल्ली कडून एटापल्लीकडे भरधाव वेगाने येणार्‍या पीकअप वाहने दुचाकीस्वारास एटापल्ली जवळील पेपरमिल कार्यालयाजवळ धडक दिली. यात अर्जुन तलांडे हा जागची ठार झाला तर सोबत असलेल्या दोन युवती गंभीर जखमी झाल्या. अपघात होताच पीकअप वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. काही नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या दोन्ही युवतींना एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेसंदर्भात एटापल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास एटापल्ली पोलिस करीत आहेत.