महसूल अधिकाèयांनी जबाबदारीने कार्य करावे-आ.अग्रवाल

0
12

गोंदिया,दि.२१ : तालुक्यातील गावांमध्ये कित्येक गरीब अतिक्रमणधारक आहेत, ज्यांच्याजवळ राहण्यासाठी व्यवस्थीत घर नाही. तरिही ते कसेही करून महसूल विभागाचा दंड भरून पट्ट्यांसाठी कागदोपत्री कार्यवाही करीत आहेत. मात्र तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालय या गरीबांच्या प्रकरणांना सोडविण्यासाठी वर्षानुवर्षे लावत आहेत. मात्र महसूल विभागातील अधिकाèयांनी हे जाणून घ्यावे त्यांची जबाबदारी लोकांप्रती असून त्यांची कामे प्राधान्याने व्हावी असा सज्जड इशारा आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिला.बैठकीत तहसीलदार सारंग मेश्राम, नायब तहसीलदार बिसेन यांच्यासह संबंधीत गावांतील तलाठी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यात सुरू असलेल्या ७-१२ दुरूस्ती व अतिक्रमणधारकांना पट्टा देण्याच्या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या कार्यालयात आयोजीत संबंधीत अधिका?्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत भूमि अभिलेख कार्यालयातील तालुका निरीक्षक पवार यांनी, तालुक्यातील ४४ गावांत पुनर्मोजणी सोबतच सर्वच त्रुटीपूर्ण ७-१२ दुरूस्त केले जात असल्याचे सांगीतले. त्यात ग्राम पिपरटोला व नवेगाव येथे बहुतांश ७-१२ त्रुटी असून पिपरटोलातील काम पूर्ण झाल्याचे सांगीतले. तर नवेगाव येथे ७-१२ दुरूस्तीचे काम जोमात सुरू असल्याचे सांगीतले.
ग्राम कटंगी-पिंडकेपार- मुर्री येथील पुनर्मोजणी पूर्ण होत असून कुडवा व फुलचूरच्या पुनर्मोजणीचे काम ऑक्टोबर महिन्यात नियोजीत असल्याचे सांगीतले.बैठकीत आमदार अग्रवाल यांनी अतिक्रमणधारकांना पट्टे देण्याच्या कामात दिरंगाई होत असल्यावर नाराजी व्यक्त केली. यावर उप विभागीय अधिकारी वालस्कर यांनी, पट्टे देण्याच्या कामाला गती देण्याचे आश्वासन दिले.