जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हाधिकाèयांच्या शेतकèयाशी संवाद

0
11

गोंदिया,दि.२१: जिल्हयातील शेतकèयांच्या मुलभूत समस्या जाणून त्यांच्या विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शेतकèयांशी थेट संवाद साधून जनसंवाद उपक्रमाची सूरुवात(दि.१५)देवरी तालुक्यातील कोटजांभोरा येथे केली.यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी बलकवडे म्हणाल्या की प्रशासन आणि नागरीक हे शासनाच्या दोन बाजू आहेत. गाव पातळीवर शेतकèयांच्या अनेक समस्या असतात परंतु त्या समस्यांचे समाधान लवकर निघावे या अनुषंगाने जनसंवाद उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी पाण्याची सोय, सिंचन व्यवस्था, जमिन, आरोग्य, पिक सर्वेक्षण अंतर्गत किड व रोग सर्वेक्षण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान बाबत माहिती देण्यात आली.तसेच विविध शेतकèयांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्याचे समाधान केले. वनपट्टेधारकांना कुंपन ओलीतांचे साधन, राशनकार्ड समस्या, धान खरेदी -बिक्री केंद्र,धानाचे चुकारे, सिंचन सोय उपलब्ध नसल्यास रब्बी पिकांच्या समस्या, विद्यूत पुरवठा ईत्यादी समस्या शेतकèयांनी जिल्हाधिकारी समोर मांडल्या.या वेळी उपजिल्हाधिकारी रोहयो सुनिल कोरडे,जिल्हा कृषि अधिक्षक भाऊसाहेब बèहाटे,उपविभागीय अधिकारी देवरी संदिप राठोड,उपविभागीय कृषि अधिकारी,कृषि अधिकारी, तहसिलदार विजय बोरुडे, तालुका कृषि अधकारी तोडसाम आदि उपस्थित होते.
शेतकèयांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी यांनी रेशिम उद्योग, मागेल त्याला शेततळे योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंतप्रधान कृषि सिंचन योजना, पंतप्रधान पिक विमा योजना, शेतीचे पूरक उद्योग म्हणून दुग्धव्यवसाय कडे वाटचाल करावी असा अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली.
देऊळगावातील पिक कापणी प्रयोगाला जिल्हाधिकाèयांची भेट
राज्यातील पिक उत्पन्नाची आकडेवारी वेळेवर कळविण्याच्या योजनेतंर्गत पिक कापणी प्रयोग खरिप (भात) जिरायत पाहणी करीता देऊळगांव येथे जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अवलोकन केले. तेसच या ठिकाणी उपस्थित कनकुबाई बुधा भालकाडे व इतर शेतकèयांना पिक कापणी प्रयोगाचे महत्व पटवून दिले.सिंदिबीरी गावात खरिप २०१८ मधील टिद्गगर -२ लागु झालेल्या तालुक्यामध्ये ग्राऊंड टुथींग सर्वेक्षणाची पाहणी केली.