पुस्तकांनी मस्तक घडते-गोविंद मुंडकर

0
12
बिलोली,दि.२१: शहरातील साठेनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यासिका केंद्रात श्री साईनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पाचपिपळी  आणि तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पुस्तके, विविध ग्रंथ अण्णा भाऊ साठे अभ्यासिकेला वितरीत करुन एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. अभ्यास केंद्रात नियमित पणे तासन् तास अभ्यास करणारे   रजनीकांत कुडके,आमोल कुडके,आरूण जेठे,आमित कुडके,अर्जुण कुडके,या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या वतीने प्रमाणपञ देऊन  गौरव करण्यात  आले. यावेळी बोलतांना पत्रकार गोविंद मुंडकर म्हणाले की ज्ञानाच्या बळावर अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी ज्ञानाशिवाय पर्याय नाही. याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच राजेंद्र पाटील कारलेकर,पत्रकार राजु पाटील शिंदे, शिंपाळकर सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव जेठे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,चांदु कुडके,गायकवाड सुर्यकांत, लोकस्वराज्य आंदोलन कार्यअध्यक्ष एल पी गोणेकर,हे होते यावेळी श्री साईनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भिमराव जाधव ,तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव डी.टी.सुर्यवंशी,पत्रकार भास्कर कुडके,मार्तंड जेठे,रियाज सय्यद,बाबु कुडके  प्रदिप इंगळे,रुग्वेद जेठे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक स्तंभलेखक कुलदीप सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन लोकस्वराज्य आंदोलनचे शहरअध्यक्ष संदिप कटारे यांनी मानले.