शहिदांना गोंदिया व गडचिरोली पोलिसांतर्फे मानवंदना

0
24

गडचिरोली/गोंदिया,दि.21 : आपले कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व जवानांना गोंदिया व गडचिरोली पोलिसांतर्फे रविवारी आदरांजली अर्पण करण्यात आली.गोंदिया पोलीस मुख्यालय कारंजा येथे शहीद स्मृती स्तभासमोर पुष्पचक्र वाहून शहिद पोलिसांना श्रध्दाजंली वाहण्यात आली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.राजा दयानिधी,पोलीस अधिक्षक हरिष बैजल,अतिरिक्त पोलीस अधिकारी संदिप आटोळे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.यावेळी पोलीस मुख्यालय परिसरात डाॅ.हेड़गेवार रक्तपेढीमार्फेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस अधिक्षकांसह रमेश बरकते,सोनाली कदम,राजीव नवले,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,राजकीय कार्यकर्ते ,पोलीसांनी रक्तदान केले.गोंदिया जिल्ह्यातल 23 पोलीसांनी नक्षलवाद्यांशी लढाई लढतांना विरमरण प्राप्त केले आहे.
राष्ट्रीय पोलीस शहीद दिनानिमित्त स्थानिक ग़डचिरोली पोलीस मुख्यालयात रविवारी सकाळी ८ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद स्मृती स्तंभासमोर एकाचवेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. धारार्थी पडलेल्या प्रत्येक हुतात्म्याचे नावाचे स्मरण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, अपर पोलीस अधीक्षक हरी बालाजी, महेंद्र पंडित, मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे, प्रदीप चौगावकर यांच्यासह जिल्ह्यातील शहीद पोलिसांचे कुटुंब उपस्थित होते.
यावेळी हवेत तीन फेक्तया झाडून शहीदविरांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राखी पोलीस निरीक्षक ठाकूर, पोलीस कल्याण शाखेचे नरेंद्र पवार यांच्यासह पोलीस जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस शहीद दिनाच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात सन १९८२ पासून आतापर्यंत एकूण ४१९ पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. प्रत्येक शहीद जवानांचे वाचन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रदीप चौगावकर यांनी केले. कार्यक्रमादरम्यान पोलीस अधिकाक्तयांनी शहिदांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.