शेतकऱ्यांना हरभरा बियांणाच्या अनुदानित पाच बॅग मिळणार

0
10
भागवत देवसरकर यांच्या मागणीला यश.
नांदेड,दि.22ः-महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदानित हरबरा बियाणे वितरित करण्यात येते.परंतू नांदेड जिल्हात एका शेतकऱ्यांना एकच बॅग देत होते.याबाबत प्रत्येक शेतकऱ्यांना पाच बॅग देण्यात यावे अशी मागणी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे केली होती.याच मागणीची दखल घेऊन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना आता पाच बॅग अनुदानित हरबरा बियाणाच देण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व ग्राम बिजोत्पादन योजनेत शेतकऱ्यांना अनुदानावर प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येते. रब्बी साठी हरबरा बियांणाची विक्री सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी बाजारात खरेदी साठी गर्दी केली होती.मात्र महाबीज कडून शेतकऱ्यांना एकच बॅग मिळत होती हे बियाणे शेतकऱ्यांना पेरणी साठी पुरेसे होत नसल्याने याचीच दखल घेऊन भागवत देवसरकर यांनी जिल्हाधीकारी अरुण डोंगरे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे यांच्याकडे जाऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली,दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांना अनुदानवर पेरणी साठी मुबलक प्रमाणात बियाण उपलब्ध करून द्याव अशी मागणी केली होती.याचीच दखल घेऊन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा देत प्रति शेतकरी पाच बॅग विक्रते यांच्यामार्फत देण्यात येणार आहेत.