काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या समस्यांवर संसदेवर धडक

0
15

नवी दिल्ली,दि.24(वृत्तसंस्था) : उद्योगपतींचे कोट्यवधींचे कर्ज माफ करणारे मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचाआरोप करीत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी विरोधी घोषणा देत संसद परिसर दणाणून सोडला. मंगळवारी संसद मार्गावर अखिल भारतीय किसान शेतमजूर काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू सह इतर राज्यातील शेतकरी ‘जबाब दो, हिसाब दो’ची घोषणा बुलंद करीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.काँग्रेसच्या या संसद घेराव आंदोलनाला मात्र जनतेपर्यंत पोचविण्यात इलेक्ट्रानिक्स मिडियाने हात मागे घेतल्याची टिकाही करण्यात आली.
अखिल भारतीय किसान शेतमजूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी नेतृत्व केले.यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, गुजरातचे प्रभारी राजीव सातव, उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिष रावत, अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत,महासचिव मुकुल वासनिक,युवा राष्ट्रीय अध्यक्ष केशव,माजी न्यायाधीश बी.जी.कोळसेपाटील,जेष्ठ काँगेस नेते हुड्डा तसेच इतर नेते उपस्थित होते. दुपारी अडीचच्या सुमारास शेतकºयांनी पटोलेंच्या नेतृत्वात संसदेला घेराव घालण्यासाठी आंदोलन स्थळावरुन मार्गक्रमण केले. आंदोलकांना रोखण्यासाठी त्यामुळे पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पटोलेंनी काही आंदोलकांसह बॅरेकेडवर चढून घोषणाबाजी के ली. पोलिसांनी नाना पटोलेंसह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मोठ्या संख्येने शेतकºयांना एकत्रित करुन वातवरण निर्मिती करण्यात काँग्रेस यशस्वी झाल्याची चर्चा होती.

 

या आंदोलनात महाराष्ट्रातून हजारोच्या संख्यने शेतकरी सहभागी झाले होते.गोंदिया भंडारा जिल्ह्यातूनही मोठ्या संख्यने शेतकरी सहभागी झालेले होते.माजी आमदार रामरतन राऊत यांच्या नेतृत्वात शेतकरी या आंदोलनात सहभागी झालेले होेते.दरम्यान माजी खासदार नाना पटोले यांच्याशी बेरार टाईम्स प्रतिनिधीने चर्चा केली असता शेतकरी प्रश्नावंर आमच्या किसान शेतमजूर सेलचा आंदोलन सतत सुरु राहणार असून येत्या काळात हे आंदोलन अधिक त्रीव करण्यात येणार असल्याचे सांगितले.विद्ममान सरकार ही शेतकरी व बहुजनविरोधी असल्याची टिकाही केली.