बिलोली नगर पालिकेला कायम स्वरुपी मुख्यधिकारी कधी मिळणार ?

0
17
बिलोली दि.२४ :शहरातील नगर परिषद क दर्जाची असुन  परिषदेला कायम स्वरुपी मुख्याधिकारी नसल्यामुळे अनेक कामे कोलमडली आहे . गेल्या चार ते पाच महिण्यापासुन बिलोली तहसिलचे नायब तहसिलदार ओमप्रकाश गौंड यांच्या कडे पदभार दिल्या मुळे व त्यांच्या कडे महसुल 1 असल्यामुळे कामाचा भार अधिक असल्यामुळे तहसिलची व नगर परिषदेची कामे वाढली आहे. म्हणुन बिलोली शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता, साफसफाई, पथदिवे हातपंप दुरुस्ती , व जनतेचे विविध प्रमाणपञे, इत्यादी कामे कोलमडली आहे.तरी सदरिल कामे सुरळीत होण्यासाठी बिलोली नगरपरिषदेला  कायम स्वरुपी मुख्याधिकारी देण्याची मागणी तहसिलदार बिलोली मार्फत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या कडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन बिलोली तहसिलचे नायब तहसिलदार संजय नागमवाड यांच्या कडे देण्यात आले.या वेळी मुव्हमेंट फॉर पिस अँन्ड जस्टीस महाराष्ट्र बिलोलीचे तालूका अध्यक्ष ए.जी.कुरेशी, सचिव सय्यद रियाज, मोफ्ती सय्यद युनुस , गौतम लंके, साबेर पटेल , प्रकाश फुगारे, यांच्या सह अनेक जन उपस्थित होते.