निवडणुका लक्षात घेत नक्षलग्रस्त भागाच्या सीमा करणार सील

0
9
file photo

: बुधवारला झालेल्यया आंतरराज्यीय समन्वय बैठकीत निर्णय, तेलगंण,मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या वरिष्ठांचा सहभाग

नागपूर,दि.25 : महाराष्ट्राला लागून असलेल्या छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यात पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुक काळात नक्षलग्रस्त सीमावर्ती भागामध्ये चोखबंदोबस्त ठेवून नक्षल कारवायांवर आळा घालण्याच्या नियोजनासाठी बुधवारला नागपूरच्या सुराबर्डी येथील नक्षलविरोधी कार्यालयात आंतरराज्यीय समन्वय समितीची बैठक पार पडली.या बैठकीत  नक्षलवलाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी तसेच त्यांच्या बिमोडासाठी पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजना, माआवोद्यांच्या माहितीचे आदानप्रदान बैठकीदरम्यान करण्यात आले. छत्तीसगड, मध्यप्रदेश व तेलंगणात निवडणुका आहेत. त्या शांततेत पार पाडण्यासाठी सर्व राज्यांनी दक्ष राहून कोणत्याही भेदभावाशिवाय सहकार्य करण्यावर भर दिला.नक्षलवलाद्यांच्या योजनेवर पाणी फेरण्यासाठी निवडणुकी दरम्यान राज्यातील नक्षलप्रभावित सीमा सील  करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक डी. कन्नकरत्नम, मध्य प्रदेश राज्याचे पोलीस महासंचालक व्ही. के. सिंग, राज्याचे विशेष कृतीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे,बालाघाटचे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक टी. शेखर, ग्रे हाऊन्डचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीनिवासन रेड्डी, जबलपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनंत कुमार सिंग, बीएसएफचे विशेष पोलीस महानिरीक्षक जे.बी. संगवान, बालाघाटचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.पी. वेंकटेश्वरराव, पोलीस उपमहानिरीक्षक इर्शाद अली, छत्तीसगडचे पोलीस उपमहानिरीक्षक सुंदरराज पी. , गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, गोंदियाचे पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांच्यासह आयटीबीपी, बीएसएफ, सीआरपी व छत्तीसगड, मध्य प्रदेश व तेलंगणा येथील पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

पोलीस आणि सुरक्षा दल हे निवडणुकीत हिंसक घटना घडविण्याची नक्षलवाद्यांची योजना कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. केल्या जातील. यादरम्यान नक्षलवाद्यांद्वारे निवडणुकीत बाधा निर्माण करण्याच्या दृष्टीने होणाऱ्या छोट्यातल्या छोट्या घटनेचेही सडेतोड उत्तर दिले जाईल.तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यादरम्यान नक्षलवाद्यांकडून हिंसक घटना घडविण्याची शक्यता आहे. या तिन्ही राज्यांच्या सीमा महाराष्ट्राला लागून आहेत. महाराष्ट्रातील गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादी सक्रिय आहेत. या पार्श्वभूमीवर एएनओ सुराबर्डी परिसरात बैठक आयोजित करण्यात आली होती.