व्ही.व्ही.पॅट तपासणी कार्यक्रम 1 नोव्हेंबर पासून

0
14

गोंदिया,दि. ३१: ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रिये नंतर 1 नोव्हेंबर पासून व्ही.व्ही. पॅट तपासणी प्रक्रिया सुरु होणार असून सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नविन प्रशासकीय इमारत जयस्तंभ चौक येथे भेट देऊन या प्रकियेची पाहणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणूकीसाठी गोंदिया जिल्हयाला प्राप्त 1594 व्ही.व्ही. पॅटची तपासणी करण्यात येणार आहे. सदर तपासणी कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्श्नात नविन प्रशासकीय इमारत येथे 1 नोव्हेम्बर पासून भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बँगलोर येथील तज्ञ अभियंते मार्फत तपासणी होणार आहे. सदर तपासणी कार्यक्रम निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत विशेष दक्षता घेऊन पार पाडला जाईल अशी माहिती उपजिल्हा निवडणुक अधिकारी शुभांगी आंधळे यांनी दिली आहे.
ईव्हीएम मशीन 3 च्या प्रथम स्तरीय तपासणी नंतर जिल्ह्याला प्राप्त 1594 व्ही.व्ही. पॅटवर दररोज तपासणी करण्यात येणार आहे. तरी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना उपस्थित राहून पाहणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. तसेच सदर तपासणी कार्यक्रम कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.00 वा. ते 5.00 वा. पर्यंत सुरु राहणार आहे.