शिवसेनेच्या बैठकित राममंदिर उभारणीसह बुथकमिटीवर चर्चा

0
26

गोंदिया,दि. ३१— अयोध्या येथे राममंदिर उभारणीच्या मुद्याला घेऊन तसेच पक्ष संघटनेवर चर्चा करण्यासाठी उद्या रविवार २८ आक्टोबंरला गोंदिया जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख निलेश धुमाड व जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सभेत 25 नोव्हेंबरच्या चलो अयोध्या अभियानावर चर्चा करण्यात आली.त्याचप्रमाणे येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर ही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली.धुमाळ यांनी कार्यकर्त्यांना पक्ष गावपातळीवर पोचवून प्रत्येक गावात बुथकमिटी तयार करण्याच्या सुचना देत राममंदीर बनिवण्याच्या मोहिमेला चळवळ बनविण्याचे आवाहन केले. जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांनी जिल्ह्यतील बुथ कमिटीची माहिती सादर केली तसेच सर्वाना राममंदीर उभारणी मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.बैठकीला.
उपजिल्हा प्रमुख तेजराम मोरघडे, सुनील पाल्लान्दूरकर,शैलेष जायस्वाल, सोहन शिरसागर,तालुकप्रमुख अमरसिंग, राजु चामाट, होमदास ब्राम्हणकर, सुनिल मिश्रा, मनोज रामटेके, संजय गायधने,डोमजी बोपचे, युवासेना जिला अधिकारी अश्विन गौतम, कगेश राव, जिला समन्वयक पिंटू चंदेल, गोंदिया शाहरप्रमुख संजय समसेरे, उपजिल्हा संघटक गोलू डोहरे,राजेश दोनोडे,शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष किशोर शाहू,महिला जिल्हा संघटक सुरेखा चव्हाण,अनुसया सोनेवाने,गोंदिया शहर संघटिका ज्योती राव,वाहतुक सेना तालुकाध्यक्ष प्रीतम लिल्हारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.