शिक्षक सहकार संघटनेकडून डीसीपीएस मृत्यू कुटुंबााला मदत

0
14

गोंदिया,दि.०४:देवरी पंचायत समितीतंर्गत येणाèया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाका येथील शिक्षक बाबुलाल दुलाराम कोरेटी यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुqबयाना गोंदिया जिल्हा शिक्षक सहकार संघटनेच्यावतीने ७९०० रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली.
महाराष्ट्र सरकारने ३१ ऑक्टोंबर २००५ नंतर नोकरीवर रुजू झालेल्या कर्मचाèयांना सेवानिवृत्ती योजना रद्द करुन नविन परिभाषित अंशदान निवृत्त योजना लागू केली आहे.परंतु या नव्या निवृत्ती योजनेचा शासनाकडेच ताळमेळ नसल्याने २००५ नंतर नोकरीवर लागलेल्या परंतु कार्यरत असतांना मृत्यू पावलेल्या कर्मचाèयांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागते.२००५ नंतर नियुक्त झालेले शिक्षक मृत्यू पावल्यास शासनाकडून त्यांच्या कुटुंबास कोणतेही लाभ दिले जात नाही. अशा स्थितीत ज्या कर्मचाèयाने आपले संपूर्ण आयुष्य शासकीय नोकरीत घालवले.त्या कर्मचाèयाचा कुटुंबाचे पालणपोषण कसे व्हावे हा प्रश्न उभा झाला आहे.या समस्येला हेरूनच गोंदिया जिल्हा शिक्षक सहकार संघटनेच्यावतीने कोरेटी यांच्या कुटुqबयाना मदत करण्यात आली.
बाबुलाल दुलाराम कोरेटी हे २००२ ला वस्तीशाळेवर नियुक्त झाले.शासनाने २०१४ साली त्यांना शिक्षक म्हणून कायम केले.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाना जुनी पेंशन योजनेचा लाभ मिळणार नसल्याने पत्नी, दोन मुले व मुलींचे पालणपोषण करतांना अडचणी येऊ लागल्या.त्या लक्षात घेताच शिक्षक सहकार संघटनेने ७९०० रुपयाची मदत कोरेंटेच्या कुटुंबीयांना केली. मदत देतेवेळी जिल्हााध्यक्ष सुरेंद्र गौतम, प्रमोद शहारे, मोहन बिसेन, कलाम, डुंडरा, उके, लवाणकर उपस्थित होते.