क्रीडा पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले

0
16

वाशिम, दि. ०: राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहसी उपक्रम दिव्यांग खेळाडूंसह, क्रीडा संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/कार्यकर्ती यांचेसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार तसेच ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरीता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. सन 2017-18 या वर्षीसाठीच्या संघटक/ कार्यकर्ते या पुरस्कारासाठीच्या संबंधित अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 25 र्नोव्हेंबर 2018 पर्यंत आहे. आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूसह क्रीडा मार्गदर्शक यांचेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 5 डिसेंबर 2018 पर्यंत आहे.www.mumbaidivsports.com या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज करता येईल. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रत स्वयंसाक्षांकीत प्रमाणपत्रांसह अर्जदाराने जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालयात सादर करावी.