विद्यार्थ्यांना दिला सुरक्षिततेचा संदेश

0
18

गोंदिया,दि.06ः-जनतेच्या सुरक्षेबाबत पोलिस विभाग सतत दक्ष असतो. त्यातल्या त्यात जिल्हा पोलिस अधीक्षक हरिष बैजल आल्यापासून जिल्ह्यातील पोलिस विभाग सुरक्षेच्या दृष्टीकोणातून जास्त दक्ष झाले आहे. याबाबत जनता व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशतून कारंजा मुख्यालयातील आरएसआय गेडाम व त्यांच्या चमूने ग्राम कारंजा येथील जिल्हा परिषद शाळेत भेट देवून विद्यार्थ्यांना सुरक्षेचा संदेश दिला.
गाडी चालविताना घरच्या प्रत्येक व्यक्तीने हेल्मेट घालावे, गुटखा-तंबाखु न खाते, आई-बाबांना इतर व्यनांपासून दूर राहण्यास आग्रह धरणे किंबा विनंती करणे, दिवाळीत फटाके फोडताना काळजी घेणे आदी संदेश अधिकारी गेडाम यांनी दिले. पुढे बोलताना गेडाम यांनी दररोज अभ्यास करून चांगल्या पदावर पोहोचण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी शाळेतील सर्व मुला-मुलींना चॉकलेट व बिस्किट पुडा वाटप करून एक प्रकारची दिवाळी साजरी केली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय बनोठे, मुख्याध्यापिका छाया कोसरकर, एल.यू. खोब्रागडे, पांडे, के.जे. बिसेन डी.आय. खोब्रागडे, एम.एम. चौरे, जी.बी. सोनवाने, नरेश बडवाईक, एस.टी. जैतवार, वर्षा कोणकर, पुजा चौरसिया, संगीता निमजेकर, ठाकूर व पोलिस मुख्यालयातील महिला व पुरूष पोलिस चमू उपस्थित होते. संचालन एल.यु खोब्रागडे यांनी केले. आभार डी.आय. खोब्रागडे यांनी मानले.