बिबट शिकारीतील आरोपी वनविभागाच्या ताब्यात

0
7

साकोली,दि.07ः-तालुक्यातील बाम्पेवाडा येथे ऑक्टोबर महिन्यात बिबटाला विद्युत प्रवाहाच्या साहाय्याने मारुन त्याला तलावात फेकल्याची घटना घडली होती. पंधरा दिवसाच्या शोधमोहिमेनंतर अखेर आरोपीला पकडण्यात वनविभागाला यश आले असून अरुण गोविंदराव वलथरे (५१) रा. बाम्पेवाडा असे आरोपीचे नाव असुन वनअधिकारी संपूर्ण घटनेचा तपास करीत आहे.
ऑक्टोबर महिन्यात वनविभागाला बाम्पेवाडा येथील तलावात एका बिबट्याला मारत टाकण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर वनविभागाने मासेमाराच्या सहाय्याने तलावातून मृत बिबट्याला काढले. तेव्हा मृत बिबट्याला विद्युत प्रवाहाने मारुन टाकण्यात आल्याचे उघडकीस आले होते.
तेव्हापासून वनअधिकारी आरोपीच्या शोधात होते. अखेर वनविभागाने आरेापीला पकडले व पुढील कार्यवाहीसाठी भंडारा येथे आणण्यात आले. यावेळी सहायक वनसंरक्षक पवार, वनक्षेत्राधिकारी बी. डी. कोळी. सहायक वनक्षेत्राधिकारी वाय. एस. तांडेकर, वनरक्षक कोरे, वनरक्षक हटवार, वनरक्षक गिर्‍हेपूंजे व सहकारी उपस्थी होते. वनविभागाला आरोपी शोधण्यास तब्बल पंधरा दिवसाचा कालावधी लागला