दुष्काळ निवारणासाठी तुकाराम महाराजांनी केली प्रार्थना

0
51

जत(राजेभक्षर जमादार),दि.08ः- हुलजंती (ता. मंगळवेढा ) येथे याञा निमित्त  महालिंगराया… बिरोबाच्या नावानं चांगभलं! अशा जयघोषात भुयार ( चिक्कलगी) येथे महालिंगराया व बिरोबा या गुरू-शिष्य भेटीच्या पालखीचे मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी जल्लोषात स्वागत करून प्रार्थना केली व नयनरम्य सोहळा हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला.
श्री महालिंगराया व श्री बिरोबा यांच्या गुरू शिष्यभेटीचा अनोखा सोहळा पाहण्यासाठी हुलजंती ता. मंगळवेढा येथे लाखो भाविक हजर झाले आहे. गुरु शिष्य पालखीचा जुना मार्ग म्हणजे भुयार(चिक्कलगी) येथून जाणारा मार्ग होय. भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी पालखीचे जल्लोषात स्वागत करून दुष्काळाच्या संकटातून सोडवण्यासाठी महालिंगराया देवाच्या चरणी प्रार्थना केली.
दिवाळी सणाच्या अमावस्येला हुलजंती येथे गुरू शिष्य भेटीचा सोहळा पार पडत असतो. या सोहळ्याला कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातून राज्यातील हजारो भाविक भक्त येत असतात. या पालखीचा अंत्यत जुना मार्ग भुयार येथून जातो . हा मार्ग हजारों वर्षापासून चा असून याला खूप जुनी पंरपंरा आहे. हा मार्ग कधीच बदलला जात नाही. असे तुकाराम महाराज यांनी सांगितले.
तुकाराम महाराज यांनी आलेल्या सर्व भाविक भक्तांना नाष्टा, जेवण, पाणी याची उत्तम सोय करून दिली होती. व यापुढे दरवर्षी पालखी सोहळयाला येणाऱ्या भक्तांची भुयार मठात सोय केली जाईल असे अभिवचन दिले.