पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा : पोलिस अधिक्षक

0
23

नांदेड,दि.,दि.११ःःजिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधिक्षक श्री. जाधव यांनी पत्रकार व पोलिसांसाठी दिवाळी फराळाचे पोलिस मुख्यालय मैदानावर शनिवारी (दि. १०) आयोजन केले होते. यावेळी श्री. जाधव बोलत होते. पत्रकारांची लेखणी ही खऱ्या अर्थाने समाजातील त्रुटी दूर करण्यासाठी व योग्य दिशा देण्याचे काम करीत असते.नांदेड : पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा असतो. तसेच पोलिस आणि पत्रकार यांचा संबंध चीखल मातीचा आहे. पोलिसांनी चांगले काम केले तर त्याची दखल आपण घ्यावी, यासोबतच काही कर्तव्यात चुक झाली तर नक्कीच आपल्या लेखणीतून ती चुक सुधारण्याची संधी द्यावी असे मत पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी व्यक्त केले.

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधिक्षक जाधव यांनी पत्रकार व पोलिसांसाठी दिवाळी फराळाचे पोलिस मुख्यालय मैदानावर शनिवारी  आयोजन केले होते. यावेळी श्री. जाधव बोलत होते. पत्रकारांची लेखणी ही खऱ्या अर्थाने समाजातील त्रुटी दूर करण्यासाठी व योग्य दिशा देण्याचे काम करीत असते. पत्रकारांनी चांगल्या समाजासाठी आपल्या लेखणीचा दरारा कायम ठेवत कुणाच्या दबावाखाली काम न करता आपल्या सद्सदविवेक बुध्दीला पटेल असे लिखान करण्याची गरज आहे. समाजाचा हा तिसरा डोळा कणखर असल्याने देशात सर्च क्षेत्रात कुरघोडी होतांना दिसत नाही.

प्रत्येकांच्या कामाचे मुल्यमापन करून ते समाजासमोर ठेवण्याची खरी किमया पत्रकारांच्या लेखणीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलिस उपाधिक्षक अभिजीत फस्के, ए. जी. खान, पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे, अनिरूध्द काकडे, मच्छींद्र सुरवसे, संदीप शिवले, द्वारकादास चिखलीकर, साहेबराव नरवाडे, एस. आर. पोकळे, एपीआय नामदेव मद्दे, अशोक लाटकर आणि श्री. आर. के. मुंडे यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलिस दलाच्या वतीने पत्रकारांना मिठाईचे वाटप केले.