स्व.रामचंद्र हरिणखेडे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त आज सत्कार समारोह

0
13

गोंदिया,दि.11ः- गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सहकार महर्षी स्व.रामचंद्रजी हरिणखेडे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त आज रविवार(दि.11)ला दुपारी 12 वाजता विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ व सहकार सम्मेलनाचे आयोजन डाॅ.कैलाशचंद्र हरिणखेडे यांचे निवासस्थान कुडवा येथे करण्यात आले आहे.कार्यक्रमाला माजी मंत्री डाॅ.राजेंद्र शिंगणे उदघाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.तर अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल राहणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रफुल पटेल,माजी खासदार नाना पटोले,माजी खासदार डाॅ.खुशालचंद्र बोपचे,आमदार सुनिल केदार,आमदार विजय रहागंडाले,वि.को.मार्केटिंगचे उपाध्यक्ष सुभाष धोटे,अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डाॅ.संतोष कोरपे,माजी आमदार हेमंत पटले उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात नागपूरचे दिलीपराव काळे,माजी आमदार सुहासराव तिडके,लोकेशचंद्र बांगरे महाराज,भिकाभाऊ चव्हाण,धन्नालाल शहारे,सुरेश अग्रवाल,प्रगतीशिल शेतकरी श्रीराम ठाकूर,जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे आदिंचा सत्कार करण्यात येणार आहे.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक डाॅ.कैलासचंद्र हरिणखेडे यांनी केले आहे.