ठाकूर बंधूनी केली विदर्भातील यशस्वी ड्रगन फळाची शेती

0
19
खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.11- परदेशात पिकणाèया फळांची लागवड आपल्या देशात करून त्याचे उत्पादन घेणे तसे आव्हानात्मक असते.त्यातच जैविक शेतीच्या क्षेत्रात अग्रसर राहणारे कृषीव्यवसायिक शेतकरी भालचंद्र ठाकूर व महेंद्र ठाकूर या बंधूनी अशा परदेशी फळाच्या हटके शेतीचा प्रयोग आपल्या ४-५  एकरच्या जागेत केला आहे.तो फळ म्हणजे ड्रगन फळ होय.विशेषतःथायलंड,व्हिएतनाम व श्रीलंकासारख्या देशात मोठ्या प्रमाणात होणाèया या ड्रगन फळाची शेती आता आपल्या भारतातही होऊ लागली आहे.विदर्भातील गोंदिया या मागास व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील प्रगतीशील व प्रयोगशिल शेतकरी ठाकूर बंधूनी या फळाची शेती सुरु केली आहे,ती गोंदियापासून अवघ्या १० किलोमीटरवर असलेल्या त्यांच्या रायपूर येथे.आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असलेल्या या ड्रगनफळाची शेती जिल्ह्यतील मातीत उपयुक्त व किफायतशीर ठरली आहे.या फळाची मागणी गोंदियाच्या बाजारपेठेसह विदर्भातील नागपूर व छत्तीसगडच्या रायपूरच्या बाजारपेठेत मोठ्याप्रमाणात असल्याचे भालचंद्र ठाकूर यांनी सांगितले.
अकोला कृषी विद्यापीठातून कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले गोरेगाव तालुक्यातील इसाटोला निवासी श्रीराम ठाकूर यांना शेतीच्या क्षेत्रात आधीपासूनच रस.त्यातच त्यांच्या मुलांनाही शेतीमध्ये आवड निर्माण झाल्याने त्यांनी जैविक शेतीला प्राधान्य देत काम केले असून आज त्यांनी विविध फळभाज्याची लागवड केली आहे.त्यातच आता पारंपारिक धानासोबतच बाजारात मागणी असणाèया एक्झॉटिक फळांच्या लागवडीचा विचार केला.आणि त्यासाठी त्यांनी चक्क व्हिएतनामवरुन या ड्रगन फळाचे रोपटे आणले.या फळांचा प्रयोग यशस्वी करायचे हे मनात ठरवून त्यांनी आव्हान पेलण्याचे ठरवले. थायलंड, व्हिएतनाम किंवा श्रीलंका देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादित होत असलेल्या  ड्रग्रन फळांची यशस्वी शेती करण्यात त्यांनी यश मिळविले आहे.
सुरुवातीला २०१५ मध्ये त्यांनी लागवड केली. त्यानंतर आज चार ते पाच एकरवर जवळपास ५८०० हून अधिक झाडांची लागवड केली आहे. या झाडांसाठी  ठिबकने पाण्याचे व्यवस्थापन केले.या महेनतीचे फळ आता त्यांना तीन वर्षानंतर मिळू लागले असून यापैकी अर्धाहून अधिक ड्रगन फळांच्या झाडाला फळ लागले आहे. ३०० ते ५०० ग्रॅमची फळे त्यांच्या बागेत तयार होत आहेत. एका झाडापासून ६ ते ७ फळे येत आहेत.विशेष म्हणजे निघालेली फळे ही ठाकूर बंधू आधी त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना,त्यांच्या शेतामध्ये भेट देणाèया आगंतुकांना आणि शासन प्रशासनातील महत्वाच्या व्यक्तींना सुध्दा आवर्जुन देतात.त्यानंतर ते स्थानिक बाजारासह छत्तीसगडच्या रायपूर येथील बाजारपेठेत मागणीनुसार फळांची विक्री करत आहेत. एका फळाला ६० ते १०० रुपये त्यांना मिळतात. डड्ढॅगन फळांचे औषधी गुणधर्म खुप आहेत. डेंग्युच्या आजार झालेल्या व्यक्तीच्या रक्तामधील पेशी वाढवण्याचे काम हे फळ करते. त्यामुळे विदर्भातील पारंपारिक शेतीला ही फळ शेती पर्याय ठरू शकते, असे सिद्ध झाले आहे.
फळ पुर्ण पिकल्यानंतर ते काढणे अपेक्षित असते. या फळाभोवती वेलीचे काटे असल्याने हे फळ कापण्यासाठी विशिष्ठ प्रकारची कात्री वापरली जाते.थायलंड व्हिएतनाम आणि श्रीलंका अशा देशात तयार होणारे हे डड्ढॅगन फळ विदर्भातल्या हवामानात घेतले जावू शकते हे ठाकूर बंधू यांनी केलेल्या फळाच्या लागवडीतून सिद्ध झाले आहे.