आंबेडकरी चळवळीचे विचारवंत डाॅ.अविनाश डोळस यांचे निधन

0
16

औरगांबाद,दि.11ः- आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत, प्रख्यात साहित्यिक तथा राज्य सरकारच्या डॉ. आंबेडकर चरित्र, साहित्य व प्रकाशन समितेचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांचे हृदयविकाराने आज रविवारला सकाळी निधन झाले.त्यांच्यावर आज सायकांळी ४:००वा.भीमनगर भावसिंगपुरा औरंगाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.डोळस यांच्या निधनामुळे फुले शाहू आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.पुरोगामी विचारवंतांनी त्यांच्या निधनाबद्दल शोकसवेंदना व्यक्त केल्या आहेत.