पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात;दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट

0
7

रायपूर(वृत्तसंस्था)दि.12 -ःछतीसगड राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी हिंसाचार सुरू केला आहे.निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सोमवारी  (12 नोव्हेंबर) सकाळी सुरुवात झाली आहे. राजनांदगावच्या 5 तर बस्तरच्या 3 जागांसाठी आज मतदान होत आहे. दंतेवाडा येथील कटेकल्याण ब्लॉकमधील तुमाकपल कॅम्प येथे नक्षलवाद्यांनी आयईडी (इम्प्रोव्हाईजड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) स्फोट घडवून आणला. तसेच नक्षलवाद्यांनी दोन किलो वजनाचा आयईडी येथे पेरला होता. मात्र यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. तुमाकपल-नयनार रस्त्यावर हा स्फोट झाला. सुरक्षा दल आणि मतदान अधिकारी सुरक्षित आहेत.दंतेवाडा येथे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. .

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी (12 नोव्हेंबर) सकाळी सुरुवात झाली आहे. बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.90 जागांसाठी 12 आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होत आहे.सुकमा येथे 100 वर्षीय वृद्ध ​महिला श्रीमति विश्वास यांनी मतदान केले असून मतदान करणारी सर्वाधिक वयाची मतदार असल्याचे बोलले जात आहे.

– राजनंदगावच्या संगवारीमधील कमला कॉलेजमधील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; मतदान थांबले

जगदलपुर येथील मतदान केन्द्र 146, 147 और 148 पर वीवीपीटी मशीन खराब झाल्याची तक्रार आली आहे.मतदारात नाराजी दिसून येत आहे.

बीजापुर येथील 107 नंबर  मतदान केन्द्रावर आत्तापर्यंत मतदान सुरु झालेले नाही. 

कांकेर आणि भानुप्रतापुर भागातील काही मतदान केन्द्रातील ईवीएम खराब झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.