मुख्य बातम्या:
राष्ट्रवादी काँग्रेसने खड्यात बेशमरची झाडे लावून केले आंदोलन# #आ.अग्रवालांनी कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाचे केले कौतुक# #कन्हैयाकुमार, प्रकाश राज रविवारी नागपुरात# #शुक्रवारपासून गडचिरोलीत कृषी व गोंडवन महोत्सव# #अकोल्यात जीर्ण इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू# #अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गुरुवारला# #नक्षल्यांनी पेरून ठेवलेले विस्फोटक पोलिसांनी केले जप्त# #"प्रविण कोचे उत्कृष्ठ पोलीस पाटील पुरस्काराने सम्मानीत"# #अवैध रेतीवाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक# #परिवर्तन स्पेशल स्कूल (पीओ आरडीएसी)  सफदरजंग एन्क्लेव में बच्चों की स्पर्धा

कॉ. माधवराव गायकवाड यांचे निधन

नाशिक,दि.12 : विधान परिषदेचे माजी विरोधीपक्षनेते, माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड उपाख्य बाबूजी यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी मनमाड येथील निवासस्थानी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहर परिसरातून दुख व्यक्त करण्यात येत आहे. एक झुंजार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात पत्नी कुसुमताई व मुलगी अ‍ॅड. साधना गायकवाड असा परिवार आहे.
नगर जिल्हातील खंडकरी शेतकऱ्यांच्या लढ्यामुळे सामान्य कष्टकरी शेतकºयांचे नेते म्हणून बाबूजींना ओळखले जात. आयुष्यात त्यांनी ज्या निवडणुका लढवल्या त्या भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या व समाजवादी पक्षाच्या आदेशा नुसार लढविल्या. विधानपरिषदही लढविली .लोकसभेच्या जालना व कोपरगाव मतदारसंघातुन निवडणुका लढवल्यामुळे अनेक बरे वाइट अनुभव त्यांना आले.१९५७ ते १९६२ च्या कालावधीत विधान परिषदेची निवडणुक संयुक्त महाराष्ट्राच्या झेंड्यासाठी त्यांनी लढवली होती. मनमाड शहराच्या नगराध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. लोकसभेच्या निवडणुकीतील पराभव मनमाड सह परिसरातील ग्रामीण भागातील जनतेच्या जिव्हारी लागला होता.सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून प्रचाराचा रान उठवले व बाबूजींना एकतर्फी मतदान करून विधानसभेत पाठवले. आपल्या आक्रमक शैलीने त्यांनी विधानसभेत आवाज उठवून तालुक्यासाठी अनेक योजना आणल्या होत्या. अशा या झुंजार नेतृत्वाला तालुका आज मुकला आहे.

Share