ग्राम नवरगाव येथे दुय्यम शायरी प्रयोगाचे उदघाटन

0
22

सावरी, दतोरा येथे मंडई चे उद्घाटन
गोंदिया,दि.१३ः- दरवर्षी प्रमाणे मंडईच्या आयोजनाची परंपरा यावर्षी गावांनी कायम राखली असून यानिमित्ताने दुय्यम शायरीचे आयोजन नवरगाव येथे करण्यात आले होते.शाहीर ताराचंद सोनवाने आणि रायवंती उपवंशी यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती.या कार्यक्रमाचे उदघाटन माजी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या हस्ते पार पडले.यावेळी बोलतांना अग्रवाल यांनी मंडई,मेला,उत्सव, नाटक,ड्रामा,दंडार हे आपल्या पूर्वजानी सुरु केलेल्या परंपरा आहेत.आधीच्या काळी जेव्हा करमणुकीचे साधन नव्हते तेव्हा अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असे.आज मंडई,मेला,नाटक हे प्रबोधनाचे साधन झाले असून देश जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा देशभक्तीपर नाटकांनी तेव्हाच्या तरुण पिढीला एक नवी दिशा दाखवली.मंडईच्या माध्यमातून आपण सर्व एकत्र येत असतो यामुळे समाजाची बांधिलकी जपून राहते.ही परपंरा अशीच टिकवून ठेवण्याचे आवाहन यावेळी केले.राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार हे जनसामान्य शेतकरी,शेतमजुर,विद्यार्थी व नोकरदारवर्गाच्या हितासोबतच देशाच्या विकासासाठी काम करीत आहे.गेल्या ७० वर्षात जेवढा विकास देशाचा झाला नाही त्याच्या कितीतरीपटीने गेल्या ४ वर्षात विकास झाल्याचे ते म्हणाले.मजुर,कामागारासांठी विमासुरक्षाकवच आणण्यात आले असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासोबतच लग्नासाठी सुध्दा शासन निधी पुरविणार असल्याचे विचार व्यक्त केले.