आज पासून ईव्हीएम वर अभिरुप मतदान पाहणी करीता राजकीय पक्षांना आवाहन

0
15
गोंदिया,दि.13:- आगामी लोकसभा निवडणूकीसाठी गोंदिया जिल्हयाला  प्राप्त झालेल्या  नविन  एम-3 श्रेणीच्या मतदान यंत्राचा ईव्हीएम तथा व्ही.व्ही.पॅटचा वापर करुन बुधवार पासून अभिरुप मतदान घेण्यात येणार आहे.  दिनांक 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत अभिरुप मतदान घेऊन जिल्हयात प्राप्त झालेल्या ईव्हीएमची तपासणी करण्यात येणार असून सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेने केले आहे.
        येत्या लोकसभा निवडणूकीमध्ये नविन एम-3 श्रेणीची मतदान यंत्रे वापरण्यात येणार आहेत. या यंत्रासोबत जोडण्यासाठी व्ही.व्ही. पॅट यंत्रेही गोंदिया जिल्हयासाठी प्राप्त झाली आहे. नविन प्रशासकीय भवन येथील गोदामात या सर्व यंत्राची तपासणी करण्याचे काम जिल्हाधिकारी डॉ. कादंकबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनात 13 नोव्हेंबर रोजी पूर्ण करण्यात आले आहे.  तसेच दिनांक 14 व 15 नोव्हेंबर 2018 रोजी ईव्हीएम व व्ही.व्ही.पॅट यंत्राचा वापर करुन अभिरुप मतदान घेण्यात येणार आहे.  मतदान करतांना काही अडचणी येतात व्ही.व्ही. पॅट मधील चिठ्ठी व्यवस्थीत येत आहे का ज्या चिन्हासामोरील बटन दाबले आहे त्याच चिन्हाला  मतदान होत आहे का याची तपासणी अभिरुप मतदान प्रकियेमध्ये करण्यात येणार आहे. तरी सर्व सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेने केले आहे.