अंध व अपंगाचे तिसरे दोन दिवसीय राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलन 17 नोव्हें.पासून

0
29

नागपूर,दि.१४: : अंध व अपंगाचे तिसरे दोन दिवसीय राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलनाचे उद्घाटन मराठी व हिंदी चित्रपटाचे सुप्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले देशातील नामांकित हास्य कवी एहसान कुरेशी हे अनेक हास्य कवीता सादर करणार आहेत. सोबतच जेष्ठ समाजसेवक डाॅ.विकास आमटे संचालित स्वरानंदवन सांस्कृतिक कार्यक्रम विशेष आकर्षण राहणार आहे तर अंध व अपंगांच्या हिताचे 19 ठराव पारित करून शासनाला सादर करण्यात येणार असून या समेलनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष आमदार प्रकाश गजभिये यांनी केले आहे.

संमेलन डाॅ.वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स नागपूर येथे सकाळी 11ः00 वाजता आयोजित केले असून पहिल्या दिवशीचे दिनांक 17 नोव्हेबरला सम्मेलनाध्यक्ष अनंत विष्णू ढोले (जेष्ठ साहित्यीक) हे आहेत तर विशेष अतिथी म्हणून प्रकाश पोहरे (संपादक, देशोन्नती), ना. राजकुमार बडोले (मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहा. महा.), सुहास तेंडुलकर (प्रदेशाध्यक्ष, राकापा.अपंग सेल), विजय कान्हेकर (संयोजक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मंुबई अपंग हक्क विकास मंच) तर संम्मेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार प्रकाश गजभिये हे आहेत. प्रमुख अतिथी डाॅ. भुषणकुमार उपाध्याय (पोलिस आयुक्त,नागपूर), श्रीमती नंदाताई जिचकार (महापौर, नागपूर), डाॅ.राजू देशमुख (संचालक, शुअरटेक रूग्णालय,नागपूर), डाॅ.सिध्दार्थ गायकवाड( प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण विभाग,नागपूर) हे आहेत व प्रमुख उपस्थिती डाॅ. उदय बोधनकर, गुणेश्वर आरीकर, शोएब असद यांची राहणार आहे. यावेळी प्रदिप देशमुख, सुनील दापोरेकर, श्रीमती प्रभा मेश्राम यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

‘‘अपगाचे साहित्य आणि कालाभिरूची’’ या विषयावर परिसंवाद होणार असून . स्वरकथन व कथाकथन या चर्चासत्राच्या े. दुपारच्या सत्रात कवीयत्री राधा बोर्डें स्मृती कवीसंम्मेलन असून  संमेलनाच्या दुसÚया दिवशी अपंग क्षेत्रातील योजना व संधीबाबत मार्गदर्शन आणि अपंगाचे क्रिडा, साहित्य व सिनेक्षेत्रातील योगदान या विषयावर परिसंवाद तसेच प्रकट मुलाखत सम्मेलनाध्यक्ष अनंत विष्णू ढोले हे आहेत तर प्रमुख अतिथी श्रीमती प्रगती पाटील, हे राहतील.

समारोपीय सत्रात विशेष अतिथी म्हणून डाॅ. विकास आमटे (संचालक, महारोगी सेवा समिती, वरोरा, चंद्रपूर), ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू, (आमदार, अचलपूर), तर सम्मेलनाध्यक्ष अनंत विष्णू ढोले हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून शैलेेंद्र पांडे (संपादक, दैनिक सकाळ), श्रीपाद अपराजीत (दै. महाराष्ट्र टाईम्स), राहूल पंाडे (शहर संपादक, हितवाद), गजानन जानभोर (कार्यकारी संपादक, लोकमत) हे राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती राहूल माकनिकर (उपायुक्त परिमंडळ 3,नागपूर), वसंत खळतकर (इंटरनॅशनल सेक्रेटरी, काॅमहाॅड,यु.के.), रोशन सोमकंुवर (निर्माता दुरदर्शन,कंेद्र,नागपूर), श्रीमती सुकेशिनी तेलगोटे (जि.स.क.अधिकारी.जि.प.नागपूर), वर्मा तेलंग (अपंगाचे सामाजिक कार्यकर्ते) हे राहणार आहेत.

या संमेलनातुन अंध व अपंग साहित्यिक व कलावंतांना मंच उपलब्ध  करून दिला जातो. त्यंाच्या अभिव्यक्ति कौशल्य व  कला आविष्कारातुन त्यंाचा जिवनसंघर्ष व उपलब्धी समाजा पर्यंत पोहचविण्यात येतात तसेच त्यंाचे अंगयुत व प्रयत्न प्राप्त सद्गुण इतर संुदर समाजाला प्रेरणादायी ठरतात. या सम्मेलनातुन अंध व अपंग बांधवांना त्यंाचा स्वाभिमान जागृत होउन सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल. या दोनदिवसीय संमेलनात राज्यातून 500 ते 700 अंध व अपंग सहभागी होणार आहेत. या संमेलनात कथा-कथन यशोगाथा, परिसवाद, कवि सम्मेलन, प्रकट मुलाखत, बाहुभाषिक कवि-सम्मेलन, पुस्तक प्रकाशन, लेखकाचे मनोगत व संस्कृतीक कार्यक्रम जेष्ठ व नव साहितिकांचे मार्गदर्शन अशा व इतर भरगच्च कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले आहे.