राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दिल्ली येथे २६ नोव्हेंबरला धरणे आंदोलन

0
14

गोंदिया,दि.१५ :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाने संविधान दिनाचे औचित्य साधून दि. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी नवी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ओबीसी समाजाच्या संवैधानिक न्याय मागण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आङ्मोजन करण्ङ्मात आले आहे. ङ्मा धरणे आंदोलनात देशातील ओबीसीच्ङ्मा ह्कासाठी लढणाèङ्मा सर्व संघटना सहभागी होणार आहेत.
ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्या पासून जनगणनेची आकडेवारी अद्यापही कुठल्याही पक्षाने घोषित केली नाही आणि या मुळे ओबीसी समाजाची दशा झाली आहे तर ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी घोषित करण्यात यावी ही प्रामुख्याने मागणी घेऊन तसेच केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, ओबीसींना लावण्यात आलेली क्रिमिलेअरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी, ओबीसी शेतकèयांच्या वनहक्क पट्टयासाठी लागणारी तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी, ओबीसी शेतकèयांना १०० टक्के सवलतीवर केंद्रात व राज्यात योजना सुरू करण्यात याव्यात, ओबीसी संवर्गाच्या कर्मचाèयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, ओबीसी समाजासाठी लोकसभा व विधान सभा स्वतंत्र निर्वाचन क्षेत्र निर्माण करण्यात यावे, न्यायालयात ओबीसींना आरक्षण देण्यात यावे, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावे या व इतर मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात ओबीसी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येंत सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे,कार्याध्यक्ष डॉ. खुशालचंद्र बोपचे, महासचिव सचिन राजूरकर, प्रसिद्धी प्रमुख व सहसचिव खेमेंद्र कटरे, प्रा. शेषराव येलेकर मनोज चव्हाण,शरद वानखेडे,महिलाध्यक्ष सुषमा भड,गोंदिया जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, अमर वर्हाडे,मनोज मेंढे, शिशिर कटरे, कैलास भेलावे, सावन डोये, पुष्पाताई खोटेले, दीपक बहेकार, विजय फुंडे, गौरव बिसने,अजय तुमसरे,महेंद्र निबांर्ते,रुचित वांढरे,गुड्डू कटरे,सुनिल भोंगाडे,गुड्डू कटरे,दिनेश हुकरे,मनोज डोये,हरिष ब्राम्हणकर आदिंनी केले आहे.