देवरी शहरात कीर्तनाद्वारे स्वच्छतेबाबत जनजागृती

0
11

देवरी, दि.१५ :-: राष्ट्रीय पातळीवर स्वच्छता स्पर्धा २०१९ ची सुरुवात झाली आहे. यावर्षी प्रथमच नवनिर्मित नगरपंचायतींना या उपक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या उपक्रमात राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची मानांकन मिळविण्यासाठी स्पर्धा असून यात नगरपंचायत देवरीही समाविष्ट आहे.
स्वच्छ सव्र्हेक्षण २०१९ मध्ये घनकचरा संकलन व त्याचे विलगीकरण हे महत्त्वपूर्ण घटक असून याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. याकरिता देवरी नगरपंचायतीने एक आगळावेगळा उपक्रम राबवित घनकचरा संकलन व विलगीकरणाबाबत जनजागृतीकरिता इंजि. भाऊ थुटे यांचे स्वच्छता प्रबोधनपर कीर्तन देवरी येथील केशोरी तलाव परिसरात आयोजित केले होते.या कीर्तनाचा प्रमुख उद्देश म्हणजे घराघरातील ओला व सुका कचèयाचे कसे वर्गीकरण करावे व आपला परिसर स्वच्छ ठेवावा, हा होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड उपस्थित होते.
कीर्तनापूर्वी स्वच्छ सव्र्हेक्षणाबाबत देवरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष कौशल कुंभरे, उपाध्यक्ष आफताब शेख, नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, प्रवीण दहीकर, गटनेता संतोष तिवारी, सुमन बिसेन यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच नगरपंचायतचे कनिष्ठ अभियंता सचिन मेश्राम नगपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.