चिचगड-देवरी राज्यमार्ग देतोय मृत्यूला आमंत्रण

0
18

चिचगड(सुभाष सोनवाने) दि.१५ :-: सार्वजनिक बांधकाम उपविभागातंर्गत येत असलेला महत्वपुर्ण राज्यमार्ग देवरी-चिचगड असून या रस्त्याच्या निकृष्ठ बांधकामामुळे ठिकठिकाणी डांबरीकरण रस्ता उखडला गेल्याने दुचाकीस्वार व चारचाकी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यातच या उखडलेल्या रस्त्यामुळे व ठिकठिकाणी पडलेल्या खड्यामुळे हा रस्ता वाहनचालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरु लागला आहे.गेल्या १५ -२० दिवसापुर्वी याच मार्गावर झालेल्या अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झाला.तर बलिप्रतिपदेच्या दिवशी ८ नोव्हेंबरला या उखडलेल्या डांबरीरस्त्यावर मोटार सायकल आणि ऑटोमध्ये झालेल्या अपघातामध्ये धनराज किशन चनाप (रा. कोटजंभोरा)याचा मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या लहान तीन मुलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.तर इसम कारू राऊत (५०) हा नागपूरच्या रुग्णालयात उपचार घेत आहे.ज्या ठिकाणी हा अपघात घडला ते ठिकाण चिचगड ते नवेगाव फाटा दरम्यान असून या डांबरीरस्त्याला जे खाचखडगे पडले त्यामुळेच अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.या डांबरीकरण रस्त्याची फारच दुरावस्था झाली असून वाहनचालक आपल्या बाजूने जात असला तरी त्याला या खड्यामुळे आपले वाहन कधी कोसळून अपघात होईल हे सांगता येत नाही.यापुर्वी आमगाव-देवरी मार्गावर खोदकामामुळे एका पोलीसाचा मृत्यू झाला तेव्हा पोलीस विभागाने कंत्राटदाराविरुध्द गुन्हा दाखल केला होता.त्याच्याकडून मृत पोलीसाच्या कुुटुंबाला मदतही करण्यात आली होती.परंतु देवरी- चिचगड हा रस्ता मोठ्याप्रमाणत खराब झाल्यानंतरही आणि या रस्तायमुळे अपघात होत असतानाही संबधित विभाग व कंत्राटदारावर कारवाई का केली जात नाही अशा प्रश्न उपस्थित होत आहे.याच मार्गाने जिल्हास्तरावरील मोठे अधिकारी,जिप.चे बांधकाम सभापती,आमदार ,खासदार हे ये जा करीत असतानाही त्यांना हा रस्ता का दिसत नाही अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तसेच परसोडी जवळील वळणरस्त्यावर असलेल्या खड्यामुळे सुद्धा कित्येक निरपराध वाहनचालक जखमी झाले आहेत.
सिंदिबिरीगावाजवळ पुलावर १०-१५ दिवसापुर्वी अपघात होऊन कित्येक नागरिकांचा बळी गेला आहे.यामुळे नागरिकात मोठा असंतोष असून बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीनंी त्वरीत दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावे अशी मागणी पुढे आली आहे.चिचगड ते ककोडी रसत्यावरील बहुतांश पुलाची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. त्यामुळे रस्त्यावरील अधिक पुलाला खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे येणाèया-जाणाèया गाड्यांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे यातील काही पुल २ ते ३ महिन्यापुर्वी सुद्धा बनले आहेत. त्यामुळे पुलाची अशी अवस्था होणे म्हणजे शंका निर्माण करणारी आहे. विशेष म्हणजे चिचगड ते ककोडी हा रस्ता ३-४ महिन्या पुर्वी बनलेला आहे. त्या रस्ता बांधाका‘ात अनिङ्म‘ितता असल्ङ्माने ठिकठिकाणी रस्ता उखडू लागला आहे. खड्डे पडू लागले आहेत. त्ङ्मा‘ुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या कामावर २ करोड ९५ लाख रुपये शासनाने खर्च केले आहेत. मात्र अधिकारी आणि जनप्रतनिधी हे कमीशन एजंटची भूमिका विभावित असल्यामुळे कारवाई होणे तर दूर याकडे ढूकुंनही कुणी पाहत नाही.