पोस्ट पेमेंट बँकेत खातं उघडताय, मग ‘या’ 10 गोष्टी नक्की जाणून घ्या !

0
14

नवी दिल्ली- इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला सप्टेंबर 2018पासून सुरुवात झाली आहे. या पोस्ट पेमेंट बँकेतून तुम्हाला तीन प्रकारची खाती उघडता येतात. त्यासाठी चालू, बचत आणि डिजिटल असे तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पोस्टाच्या वेबसाइटवरही पोस्ट पेमेंट बँकेसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. भारतीय पोस्टाच्या अंतर्गत येणारी इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) ही विशेष आहे. ही 100 टक्के सरकारी योजना आहे.
रेग्युलर सेव्हिंग अकाऊंट- इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतून बचत खातं उघडता येऊ शकतं. आयपीपीबीनं स्वतःच्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती दिली आहे. वेबसाइटवर पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा करणे, पैसे काढणे आणि पैसे सुरक्षित ठेवण्यासंदर्भात माहिती उपलब्ध करून दिली आहे. या रकमेवर तुम्हाला व्याज मिळणार आहे. साधारणतः बचत खात्यावर 4 टक्के व्याज मिळणार आहे.

  • बेसिक सेव्हिंग अकाऊंट- आयपीपीबीचं बेसिक सेव्हिंग अकाऊंटमध्ये रेग्युलर सेव्हिंग अकाऊंटच्या सर्व सुविधा मिळतात. परंतु या खात्यातून तुम्ही महिल्याला फक्त चार वेळाच पैसे काढू शकता. या खात्यावरही तुम्हाला वर्षाला 4 टक्के व्याज मिळतं.
  • डिजिटल सेव्हिंग अकाऊंट- पोस्ट पेमेंट बँकेतल्या या खात्याला विशेष महत्त्व आहे. टेक्नोसॅव्ही लोकांसाठी आयपीपीबीनं हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तुम्ही आयपीपीबीच्या मोबाईल अॅपद्वारे या खात्यावर नियंत्रण ठेवू शकता. गुगल प्ले स्टोअरमधूनही हे अॅप डाऊनलोड करता येते. 18 वर्षांच्या वरील व्यक्ती पॅन कार्ड आणि आधार कार्डाच्या माध्यमातून हे खातं उघडू शकते. तुम्ही घरी बसून हे खातं उघडू शकता. या खात्यावरही तुम्हाला वर्षाला 4 टक्के व्याज मिळतं.
  • व्याज दर- भारतीय पोस्ट पेमेंट बँकेतल्या सर्व खात्यांवर तुम्हाला 4 टक्केच व्याज मिळतं. व्याजाचा दर तिमाहीच्या आधारावर ठरवला जातो.
  • कसं उघडाल खातं? 

चालू आणि बचत खातं तुम्ही आयपीपीबीच्या जवळच्या केंद्रात जाऊन उघडावं लागतं. तर डिजिटल सेव्हिंग अकाऊंट तुम्ही मोबाइल अॅपच्या माध्यमातून उघडू शकता. तुम्ही मोबाइल अॅपच्या माध्यमातून हे अकाऊंट उघडू शकता. आयपीपीबीचं मोबाइल अॅप सध्या अँड्रॉइड मोबाईल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

  • खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा- बचत आणि डिजिटल सेव्हिंग खात्यामध्येही आयपीपीबीच्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिन्यातून बऱ्याच वेळा या खात्यातून पैसे काढता येतात. बेसिक सेव्हिंग अकाऊंटमध्ये तुम्हाला महिन्यातून फक्त चार वेळाच पैसे काढता येतात.
  • बॅलन्स ठेवण्याची गरज- ही तिन्ही अकाऊंट झिरो बॅलन्समध्येही उघडता येतात. आयपीपीबीच्या वेबसाइटवर याची माहिती दिली आहे.
  • अधिकतम बॅलन्सची मर्यादा- आयपीपीबीच्या तिन्ही अकाऊंटमध्ये तुम्ही एक लाखांपर्यंत पैसे ठेवू शकता.
  • पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटला लिंक करण्याची सुविधाः भारतीय पोस्ट पेमेंट बँकेनं ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, तुम्ही पोस्टातलं अकाऊंट या बँकेच्या अकाऊंटशी लिंक करू शकता. परंतु डिजिटल सेव्हिंग अकाऊंटला हा पर्याय नाही.
  • मोफत तिमाहीचं स्टेटमेंट- आयपीपीबी काही अटींच्या अंतर्गत ग्राहकांना प्रतिमहा एक स्टेटमेंट मोफत देते. परंतु त्यासाठी ग्राहकांचं ट्रान्जेक्शन कमीत कमी असायला हवे.
  • पेड स्टेटमेंट- जर तुम्हाला अतिरिक्त स्टेटमेंट हवं आहे. तर त्यासाठी तुम्हाला 50 रुपये मोजावे लागतील.
  • मनी ट्रान्सफर- आयपीपीबीच्या तिन्ही खात्यांवर एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे वळते करण्याची सुविधा मिळते.
  • फ्री सर्व्हिस- चालू, बचत आणि डिजिटल खात्यांवर तुम्हाला बऱ्याच सुविधा मोफत मिळतात. या सुविधांमध्ये एसएमएस अलर्ट, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आणि बिल पेमेंटचा समावेश आहे.