गोसलिया कॉलेज मध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा 18 नोव्हेंबरला

0
10

सांगली,दि.17ः -श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया ज्युनि. कॉलेज अॉफ एज्युकेशन ,मिरज अध्यापक विद्यालयाला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याने सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने रविवार 18 नोव्हेंबर रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून इंद्रजित देशमुख प्रसिद्ध विचारवंत व माजी मुख्य कार्यकारी अधिकारी,संजय भोकरे श्री अंबाबाई तालीम संस्था मिरज ,संपतराव गायकवाड माजी शिक्षण संचालक ,गौतम शिंगे उपस्थित राहणार आहेत.अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी लिहलेल्या स्मृतिगंध या स्मरणिकेचे प्रकाशन व सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी होणार आहे.