एसटीची रुग्णवाहिकेला धडक,रुग्णवाहिकेतील वृद्धेचा मृत्यू

0
10
गोंदिया,दि.17ः – गोंदिया-तिरोडा-तुमसर या महामार्गावर आज सायकांळी 5 वाजेच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील सरांडी गावाजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसने रुग्णवाहिकेल्या दिलेल्या धडकेत रुग्णवाहिकेतील एका महिलेचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याची घटना घडली.जखमींना गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.तिरोडा येथील एका खासगी रुग्णालयातून रुग्ण घेऊन नागपूरला निघालेल्या रुग्णवाहिकेला अकोला-तिरोडा(एमएच40,एक्यु6187) याबसने सरांडी गावाजवळ धडक दिली. या धडकेत रुग्णवाहिकेतील ७५ वर्षीय महिला रूग्ण अंजनाबाई सहारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रुग्णवाहिकेचा चालक राजा कारेकर आणि मृताची मुलगी आणि मुलगा हे या अपघातात जखमी झाले.