ऊस पिकाचे नियोजन केल्यास एकरी 200 टन उत्पादन सहज शक्य- कृषीभूषण संजीव माने

0
126
नांदेड,दि.18_- शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊस पिकाचे व्यवस्थित नियोजन केल्यास एकरी 200 टन ऊसाचे उत्पादन सहज शक्य आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी उसाचे पीक घेताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत कृषीभूषण संजीव माने यांनी लिगापुर ता.हदगाव येथे ऊस उत्पादक व रब्बी हंगाम मार्गदर्शन मेळाव्यात बोलतांना व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद प्रदेश संघटक चक्रधर पाटील देवसरकर तर प्रमुख पाहुणे तालुका कृषी अधिकारी रणवीर साहेब, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष माधव देवसरकर, जिल्हाध्यक्ष संतोष माने,विदर्भ संपर्क प्रमुख शिवाजी जाधव,कृषी परिषदेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष गजानन कदम,संदीप पावडे,रविराज धबडगे, पंचायत समिती सदस्य शंकर मेंडके,संदीप राठोड,कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. देविकांत देशमुख,मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अविनाश कदम,कृषी परिषदेचे तालुका अध्यक्ष विलास माने,परमेश्वर काळे,अमोल पाटील ,युवक काँग्रेसचे शिवाजी पाटील वाघीकर, संयोजक तथा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर अादी विचारमंचावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना संजीव माने यांनी उसाच्या लागवडी पासून ते काढणी पर्यंत कसी काळजी घ्यावी याच सविस्तर विवेचन केले,उसाची लागवड प्रती एकरी चाळीस ते पंचेचाळीस हजार डोळ्यापर्यंत असावेत,त्यांनी खताचा व औषधीच मात्रा किती द्यावा,व स्वतचा अनुभव सांगून एकरी 20 टन पासून 150 टन उत्पादन पर्यंत कसे गेलो याच सविस्तर मार्गदर्शन केले.पुढील काळात एकरी 200 टन पर्यंत उत्पादन काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शास्त्रज्ञ डॉ देविकांत देशमुख यांनी हळद,गहू, हरभरा पिकावर मार्गदर्शन केले तर तालुका कृषी अधिकारी रणवीर साहेब यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा व त्या राबवून आपला फायदा होईल याची काळजी घ्यावी असे सांगितले. प्रास्ताविक मध्ये आयोजक भागवत देवसरकर यांनी आयोजन मागची भूमिका विषद करताना शेतकऱ्यांना नेहमी प्रोत्सहन देऊन त्यांच्या अडचणी कृषी परिषदेच्या माध्यमातून सोडवू असे सांगितले.तालुक्यात विक्रमी उसाचे उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
 यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील रुईकर, प्रा.शशिकांत धानोरकर,सचिन तांदळे,कृषी सहायक अशोक खरात,तावडे, पिल्लेवाड,इंगळे,कृषी परिषदेचे अविनाश कदम,शेख रहीम, हरिदास कदम,अविनाश ताकतोडे,दीपक देशमुख,सरपंच ईश्र्वरा कामशेतवाड,प्रा.राजेंद्र कदम,कुणाल पाटील मोरे,गजानन पाटील दुधडकर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल देवसरकर,संतोष देवसरकर,ज्ञानेश्वर देवसरकर, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन देवसरकर,भगवान देवसरकर,संदीप पाटील,आशिष पाटील,अरविंद पाटील, पांडुरंग देवसरकर, जयवंत पाटील,दत्ता देवसरकर,प्रा.अनिल कवडे,अविनाश ससाणे,संदीप कवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी जाधव,तर आभार प्रदर्शन अनिल देवसरकर यांनी केले.कार्यक्रमास परिसरातील प्रगतशील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.