वैनगंगा नदीत प्रेमी युगुलाची आत्महत्या

0
8
सकाळी ९ वाजताच्या दरम्यान कारधा गावाच्या वैनगंगा नदीतीरावर लोकांना २ मृतदेह एकमेकांनी बिलगून पाण्यावर तरंगताना दिसले. याविषयीची माहिती कारधा पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरुन ढिवर बांधवांच्या साह्याने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर लक्षात आले की, हे दोन्ही प्रेमीयुगुल असून यांनी आत्महत्ये अगोदर एकमेकांच्या हातांना ओढणीने बांधून घेतले होते. त्यामुळे मरण पावल्यानंतर दोघांचे मृतदेह एकमेकांच्या सोबतच होते. त्यांच्या जवळ असलेल्या मोबाईलवरुन त्यांची ओळख पटवण्यात आली आहे.

विशालच्या आईने दिलेल्या माहितीनुसार विशाल हा गुरुवारी घरामधून सायंकाळी ६ वाजता १०० रुपये घेऊन आत्याकडे मंडईसाठी जात असल्याचे सांगून निघून गेला. त्यानंतर आज सकाळी त्याचा मृतदेह कारधा गावातील वैनगंगा नदीच्या तीरावर मिळाल्याची माहिती मिळाली. त्यांनी घटना स्थळावर येऊन पाहणी केली असता विशालची आणि मुलीची ओळख पटवली. विशाल अगदी लहान असताना त्याचे बाबा जळून मरण पावले होते.या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार संतापे, अशोक सरोदे हे करीत आहेत.