म्हाडा अध्यक्ष कुरैशी यांच्या घरात चोरी;दागिण्यासह रोकड लंपास

0
8

तुमसर,दि.19 :- म्हाडा हाऊसिंग सोसायटी व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष मो.तारीक कुरैशी यांच्या घरात चोरीची घटना घडली आहे. कोणीही नसल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी कुरैशी यांच्या शिवाजी नगरातील घरी सदर घटनेला पुर्णत्वास आणले. त्यात त्यांच्या घरातील सोन्याचे दागीणे व ३० हजारांची रोकड अशा एकुण ६० हजाराच्या मुद्देमालावर चोरांना डल्ला मारला. मात्र घटनेत नेमक्या कीती चोरांचा समावेश होता यांचा उलघडा लागलेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार कुरैशी परिवार नव्हेंबरच्या १५ तारखेपासुन १८ दरम्यान घरी नव्हते. त्याच दिवसांमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या घटनेला पुर्णत्वास आणले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तविन्यात येत आहे. मात्र रविवारच्या रात्री १० दरम्यान घरी परतलेल्या कुरैशी परिवाराला आपल्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. घरातील सामान इतरत्र पडलेल्या अवस्थेत व दागिणे असलेले कपाट उघडे आढळुन आले होते. चोरी झाल्याचे लक्षात येताच कुरैशी परिवाराने तुमसर पोलिसांना सुचना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मौका पंचनाम्या दरम्यान व घरच्या सदस्यांनी दिलेल्या माहीतीनुसार घरातील ३० हजाराची रोकड चोरीला गेल्याचे निष्पण झाले. त्यात कपाटातील सोन्याचे दागिणेही अज्ञात चोरांनी लंपास केले. पोलिस माहीतीनुसार चोरीला गेलेले दागिणे जवळपास ३० हजार रुपये किमतीचे होते. तुमसर पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध भादवी कलम ४५४,४५७ व ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो नि मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण अधिकारी सपोनी जटाळ करीत आहेत.