हेटळकसा जंगल परिसर चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार

0
15

गडचिरोली,दि.१९: धानोरा व कोरची तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या न्याहाकल-हेटळकसा जंगल परिसरात आज सकाळी 8 ते 9.30 वाजेच्या दरम्यान पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन्ही महिला असून, एकीची ओळख पटली आहे. बबिता नरसू गावडे उर्फ शांताबाई बारसू नैताम(२८) रा.फुलकोडो, ता.धानोरा असे तिचे आहे.अजूनही त्या भागात नक्षलविरोधी अभियान सुरुच आहे.मृत नक्षल्यांची संख्या वाढण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला जात आहे.हे अभियान अप्पर पोलीस अधिक्षक डाॅ.हरी बालाजी यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात विशेष अभियान पथकाचे जवान तसेच सीआरपीएफ 192 यंग प्लाटूनचे जवान सर्चिंगवर असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला.त्याला प्रतित्युरादाखल पोलीसांनी देखील गोळीबार सुरु केला

पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. पोलिसांना घटनास्थळावर दोन नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले असून, ते ताब्यात घेतले आहेत. नक्षल्यांची शस्त्रे व काही दैनंदिन वापराचे साहित्यही पोलिसांना मिळाले आहे. मृतांमध्ये दोन्ही महिला असून, त्यापैकी एका महिला नक्षलीची ओळख पटली आहे. बबिता नरसू गावडे उर्फ शांताबाई बारसू नैताम(२८) रा.फुलकोडो, ता.धानोरा असे तिचे आहे. बबिता ही प्लाटून क्रमांक १५ व टिपागड दलमची सदस्य होती. तिच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये १६ गुन्हे दाखल असून, शासनाने तिच्यावर ४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दुसरीची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. दुपारी दोघींचेही मृतदेह गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात आणण्यात आले.