उत्तर नागपुरातील शेकडो महिला पुरुषांचा मनसेत प्रवेश

0
14
नागपूर,दि.21ः-उत्तर नागपुरातील असंख्य महिला व पुरुषांनी गुरुनानक सभागृहात आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात पक्ष प्रवेश केला. मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात ऍड तिलक लारोकर, भरत पराते,या मान्यवरांसोबत जिल्हा अध्यक्ष किशोर सरायकर, व सतीश कोल्हे, शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे, महिला शहर अध्यक्ष मनीषा पापडकर व संगिता सोनटक्के, उपशहर अध्यक्ष विकास खोब्रागडे उपस्थित होते. यावेळी हेमंत गडकरी यांनी आपल्या परिसरातील जनहितार्थ समस्या सोडवून लोकांची मने जिंकून राजसाहेबांचा नवंनिर्माणाचा विचार घरोघरी पोहचविण्याचे आवाहन केले.संचालन शैलेश बातुलवार यांनी तर सुरेश पाटील यानी आभार मानले. राहुल पराते यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला उपशहर अध्यक्ष प्रशांत निकम,वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष सचिन धोटे, श्याम पुनियानी, विभाग अध्यक्ष उमेश बोरकर,चंदू लाडे, पिंटू भिसेन,उमेश उत्तखेडे, शशांक गिरडे, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष सचिन धोटे,मंगेश शिंदे,गजानन टिपले, मनविसेचे जिल्हा अध्यक्ष दिनेशबाबू इलमे,शहर अध्यक्ष आदित्य दुरुगकर, कल्पना चव्हाण,रजनीकांत जिचकार, महेश माने,सुनील गवई,सुजित मधूमटके, सुश्रुत खेर,मनोज गुप्ता,छाया खापेकर, दीपक उज्जनकर, मनोज कहालकर अभिजित याउल,, निखिल झाडे, मेघना बातुलवार, विनिषा पराते, गणेश साहू,अभिषेक माहूरे,विपीन धोटे, अभय व्यवहारे,नंदू रायपुरे, प्रभू सरंजामे व मोठ्या प्रमाणात  प्रवेश कर्ते नागरिक उपस्थित होते