मधुकर कांबळे यांचा दौरा कार्यक्रम

0
10

वाशिम, दि. २२ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकर कांबळे हे २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. सकाळी ९ वाजता अकोला येथून मालेगावमार्गे वाशिमकडे प्रयाण करतील.सकाळी ११  वाजता वाशिम शासकीय विश्रामगृह येथे आगमन व स्थानिक कार्यकर्त्यांसमवेत बैठक. दुपारी १.३० वाजता शासकीय वाहनाने वाशिम येथून अकोलाकडे प्रयाण करतील. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता अकोला येथून शासकीय वाहनाने मालेगावमार्गे मंगरूळपीरकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह, मंगरूळपीर येथे आगमन व स्थानिक कार्यकर्त्यांसमवेत बैठक. दुपारी १.३० वाजता शासकीय वाहनाने मंगरूळपीर येथून अकोलाकडे प्रयाण करतील.