ग्लासफोर्डच्या पणतूंची सिरोंच्यातील ग्लासफोर्ड गावाला भेट

0
16

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.29ः-ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील सिरोंचा व बस्तर क्षेत्राचे जिल्हाधिकारी म्हणून सिरोंचा मुख्यालयी 1852 ते 1862 या काळात कार्यरत राहिलेल्या चार्ज हेल्मेट राबर्टसन ग्लासफोर्ड यांच्या पणतूनी बुधवारला सिरोंचाला भेट देत आपल्या पणजोबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. फिटर ग्लासफोर्ड (वय 87), सुजन ग्लासफोर्ड (वय 83)व जेनिफर हनमोल्ड (वय 77) यांनी आस्ट्रेलिया वरून सिरोंचा तालुक्यातील बामणी जवळील ग्लासफोर्डपेठा या गावाला भेट देऊन गावातील नागरिकांसोबत सवांद साधला.या गावाचे दिडशे वर्षापुर्वी चार्ज हेल्मेट राबर्टसन ग्लासफोर्ड यांच्या नावावर ठेवण्यात आले.सिरोंचा हे मद्रास प्रांतात असताना जिल्हा मुख्यालयाचे स्थळ होते.आज मात्र तालुक्याचे ठिकाण बनले आहे.  बुधवारी ग्लासफोर्ड यांचे पणतू पीटर ग्लासफोर्ड (८७), सुजन ग्लासफोर्ड (८३), जेनिफर हनमोल्ड (७७) यांनी बामणीजवळील ग्लासफोर्ड पेठा या गावाला भेट दिली. आपले गाव वसविणाऱ्या अधिकाऱ्याचे पणतू गावात आल्याचे समजताच गावकऱ्यांनी गर्दी केली. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गावकऱ्यांचे प्रेम पाहून हे तिघेही भारावून गेले होते. सिरोंचा येथे त्यांच्याशी माजी उपसरपंच रवी सल्लमवार, नागपूरचे हिंमाशू, ग्लासफोर्ड येथील देवा मेडी, माजी उपसरपंच व्येंकटस्वामी कारासपल्ली आदी उपस्थित होते.विशेष म्हणजे ग्लासफोर्ड यांनी सिरोंचा परिसरातील वन्यजिव जंगल,नद्यावर जवळपास 20 पुस्तके लिहिली आहेत.ते त्यासाठी वारंवार या भागात यायचे त्यांच्या एका पुस्तकात सिरोंचा तालुक्यातील ग्लासफोर्ड या गावाचा उल्लेख वाचतांना त्यांच्या पणतूना आढळले आणि त्यांनी या गावाला भेट देण्याचा मानस तयार केला.त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी सवांद साधल्यानंतर ते सिरोंचा येथे दाखल झाले.त्यांनी सिरोंचा येथील विद्यमान विश्रामगृह जे त्याकाळी जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान व कार्यालय होते त्यास भेट देऊन पाहणी केली.तसेच परिसरातील मान्यवरांशी चर्चा केली.