रस्ते विकासातून येणार औद्योगिक क्रांती-आ.अग्रवाल

0
16

गोंदिया,दि.30 : शेतकऱ्यांच्या समृध्दीमुळेच परिसर खºया अर्थाने समृध्द होईल.शेतकरी अधिक समृध्द व्हावा यासाठी परिसराचा सर्वांगिन विकास होणे आवश्यक आहे. रस्त्यांचा विकासामुळेच परिसरात उद्योग धंदे स्थापन होवून औद्योगिक क्रांती होण्यास मदत होईल. तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील देवरी-सोनबिहरी-बलमाटोला, देवरी-किन्ही-डांर्गोली-तेढवा या ११ कोटी रुपयांच्या रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, विमल नागपूरे, प्रकाश रहमतकर, नटवर जैतवार, सरोज मस्करे, निता पटले, विनिता टेंभरे, रुखन चिखलोंडे, चैनलाल लिल्हारे, हनस गराडे, रामेश्वर हरिणखेडे, मनोज नागपुरे, डॉ. मनोहर चिखलोंडे, जयचंद डहारे, ओम रहांगडाले, विक्की बघेले, योगेश बिसेन, व्यकंट मेश्राम, मिना चोखांद्रे, कृपाल लिल्हारे, नमिता शहारे उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, या क्षेत्रातील शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी येणाºया काळात नवेगाव-देवरी उपसा सिंचन योजनेची मदत होणार आहे. या योजनेचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याचा लाभ दवनीवाडा, धापेवाडा, रतनारा या परिसरातील शेतकऱ्यांना मिळेल. या योजनेचे पाणी थेट बाघ सिंचन प्रकल्पांच्या नहरांव्दारे सोडण्यात येणार असून यामुळे या क्षेत्रात हरितक्रांती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आ. अग्रवाल यांच्या माध्यमातून मागील २५ वर्षांपासून या क्षेत्रात विविध विकास कामे सुरू आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे जि.प.सदस्य रुद्रसेन खांडेकर यांनी सांगितले. अर्जुन नागपुरे यांनी आ.अग्रवाल यांच्या माध्यमातून सिंचन, रस्ते तसेच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यातील त्रृटी दूर करण्यास मदत झाली.त्यांच्याच सक्षम नेतृत्त्वामुळे परिसराचा सर्वांगिन विकास झाल्याचे सांगितले. या वेळी आ.अग्रवाल यांच्या हस्ते रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.