नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विद्याथ्र्यांना सफारी शुल्कात सवलत

0
104
OLYMPUS DIGITAL CAMERA

गोंदिया दि.३०: गोंदिया-भंडरा जिलह्यात असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात पर्यटनांकरिता येणाèया महाविद्यालयीन तसेच शालेय विद्याथ्र्यांना निसर्ग संवर्धनाच्या सामाजिक जवाबदारीची जाणीव ठेवत तसेच निसर्ग वारसाची ओळख होण्याच्या उद्देशाने प्रवेश व सफारी शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जास्तीत-जास्त विद्याथ्र्यांनी भेटी देऊन व्याघ्र व वन्यजीव संवर्धनाचे महत्व समजून घ्यावे. विविध वन्यप्राण्यांची व वनस्पतीची माहिती घ्यावी या उद्देशाने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व सहलीत उपस्थित शिक्षकांना काही अटी व शर्तीच्या माध्यमातून सफारी शुल्कात सवलत देण्यात आलेली आहे. त्यामध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पच्या बफर क्षेत्रातील शाळा/महाविद्यालयांच्या विद्याथ्र्यांना ७५ टक्के सवलत राहणार आहे. तर गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बफर क्षेत्राबाहेरील शाळा-महाविद्यालयांच्या विद्याथ्र्यांना ५० टक्के सवलत व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांच्या विद्याथ्र्यांना २५ टक्के सवलत देण्यात आलेली आहे. ही सवलत संबंधित शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या पत्रावर राहणार आहे. शाळेचे वाहन हे २५ आसन क्षमतेपेक्षा जास्त मोठे असू नये. व्याघ्र प्रकल्पात जास्तीत-जास्त २५ आसनक्षमता असलेली बसला परवानगी देण्यात आलेली आहे. तर प्रकल्पातील वाहन शुल्क व निसर्ग मार्गदर्शकांचे (इको-गाईड) शुल्कामध्ये कुठलीही सवलत मिळणार नसून व्याघ्र प्रकल्पात प्रवेश हे सध्याची वाहन क्षमते (केरींग कॅपेसीटी) च्या अधीन राहूनच देण्यात येणार आहे. तरी सदर सवलतीचा जास्तीत-जास्त शाळांनी व विद्याथ्र्यांनी फायदा घेवून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा फायदा घ्यावा असे आवाहन नवेगाव व नागझिरा व्याघ्र क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक गोंदिया यांनी केले आहे