१ ते ३० डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात फिरते लोकअदालत

0
17
  • जिल्हा न्यायालय येथे आज उद्घाटन
  • आपसी मतभेद निकाली काढण्यासाठी होणार मदत
  • जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घेण्याचे आवाहन

वाशिम, दि. ३० :  जिल्हा व सत्र न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात फिरते लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा व सत्र न्यायालय येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे यांच्या हस्ते या फिरते लोकअदालतीचे उद्घाटन होणार आहे.

फिरते लोकअदालतीमध्ये दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात दावे, भूसंपादन नुकसान भरपाईचे दावे, वैवाहिक संबंधातील वाद, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट कलम १३८ खाली प्रकरणे कोर्टात दाखल न झालेली प्रकरणे (प्री-लिटीगेशन), पाणीपट्टी, मालमत्ताकर, मोबाईल देयक, विद्युत देयक प्रकरणे समेटासाठी मांडता येवू शकतात.

वाशिम तालुक्यात १ डिसेंबर रोजी सोनखास ग्रामपंचायत, २ डिसेंबर रोजी तामसी ग्रामपंचायत, ३ डिसेंबर रोजी वाशिम येथील जिजाऊ सभागृह, ४ डिसेंबर रोजी वाशिम वाहतूक पोलीस शाखा, ५ डिसेंबर रोजी केकतउमरा ग्रामपंचायत, मंगरूळपीर तालुक्यात ६ व ७ डिसेंबर रोजी शेलूबाजार ग्रामपंचायत, ८ डिसेंबर रोजी मंगरूळपीर कोर्ट परिसर, ९ डिसेंबर रोजी धानोरा ग्रामपंचायत, १० डिसेंबर रोजी आसेगाव ग्रामपंचायत, कारंजा तालुक्यात ११ डिसेंबर रोजी कारंजा, १२ डिसेंबर रोजी धामणी, १३ डिसेंबर रोजी पोहा, १४ डिसेंबर रोजी कामरगाव, १५ डिसेंबर रोजी उंबर्डा बाजार, मानोरा तालुक्यात १६ डिसेंबर रोजी तळप बु. १७ डिसेंबर रोजी भोयणी, १८ डिसेंबर रोजी कोंडोली, १९ डिसेंबर रोजी गव्हा, २० डिसेंबर रोजी कोलार, रिसोड तालुक्यात २१ डिसेंबर रोजी लोणी बु., २२ डिसेंबर रोजी भरजहांगीर, २३ डिसेंबर रोजी केशवनगर, २४ डिसेंबर रोजी चिंचाबाभर, २५ डिसेंबर रोजी मांगुळ झनक, मालेगाव तालुक्यात २६ डिसेंबर रोजी शिरपूर, २७ डिसेंबर रोजी डोंगरकिन्ही, २८ डिसेंबर रोजी अमानी, २९ डिसेंबर रोजी मेडशी व ३० डिसेंबर रोजी जऊळका रेल्वे याठिकाणी फिरते लोकअदालतीचे आयोजन केले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने करण्यात आले आहे.