डिजिटल इंडिया मुळे योजनांचा लाभ देणारी प्रक्रिया सुलभ : विनोद अग्रवाल

0
28

गोंदिया,दि.30ः-योजना भरपूर असतात पण जर त्या योजना जनतेपर्यंत थेट पोचल्या नाहीत तर त्या योजना कागदावरच राहून जतात. जे लोक योजनांचा लाभ देणारी प्रक्रिया सुलभ करा म्हणत आहेत त्यांनी स्वतःचे सरकार असतांना काय केले? असा अप्रत्यक्ष टोला  विनोद अग्रवाल यांनी स्थानिक लोक प्रतिनिधींना लगावला. २०१४ ला नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी डिजिटल इंडिया च स्वप्न पाहिले. नुसते स्वप्नच नाही पाहिले तर ते पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान देखील राबवले. ज्यामुळे गावातील युवक आणि युवती डिजिटल साक्षर झाले असे विचार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले.

दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा ग्राम निलज येथे विठ्ठल रुख्मिणी प्रांगणात सार्वजनिक कार्तिक यात्रेचे उदघाटन माजी जि . प. उपाध्यक्ष तसेच माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्र विनोद अग्रवाल यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. पुढे म्हणाले की, मंडई , मेला , उत्सव, नाटक,ड्रामा,दंडार हे आपल्या पूर्वजानी सुरु केलेल्या परंपरा आहेत. आधीच्या काळी जेव्हा करमणुकीचे साधन नव्हते तेव्हा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असे.मेला , नाटक हे प्रबोधनाचे साधन झाले.देश जेव्हा स्वतंत्र नव्हता तेव्हा देशभक्तीपर नाटकांनी तेव्हाच्या तरुण पिढीला एक नवी दिशा दाखवली.एक प्रकारे क्रांतीचे साधन मंडई, मेला झाले. मंडई मुळे आपण सर्व एकत्र येतो भेटतो याने समाजाची बांधिलकी जपून राहते.यावेळी संगीताताई रहांगडाले (सरपंच ), भाऊलालजी सिंगनधुपे , टेकचंदजी तुरकर , सोमेश्वरजी पटले, एच. एन . गाते , मेश्राम सर, हेमंतजी तुरकर , जगतरायजी बिसेन , सोमेश्वरजी हरिणखेडे , अतुलजी तुरकर , रिखिलालजी बिसेन , अविनाशजी जुगनहाके , भुमेशजी तुरकर , सुरेंद्रजी वासनिक , सुनीताताई तुरकर , लताताई कुसराम , उषाताई डहाट , सविता मेश्राम, रिनाताई मडावी आणि अन्य गावकरी बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.