आसंगीतुर्क शाळा बनली डिजीटल

0
21

जत(सांगली),दि.30ः- जिल्हा परिषद शाळा आसंगी तूर्क (जत) शाळा डिजिटल होण्यासाठी एक पाऊल पुढे येत ग्रामपंचायत 14 व्या वित्त आयोगातून सरपंच  वंदना सुर्याबा शिंगाडे, ग्रामसेवक कोकरे, शाळेचे मुख्याध्यापक मनोज खोकले तसेच शिक्षण प्रेमी तानाजी वाघे,ग्रामपंचायत सदस्य सिद्धू बसर्गे यांनी एलईडी टीव्ही संच शाळेला देऊन खऱ्या अर्थाने शाळा डिजिटल बनवण्यास सहकार्य केले.डिजिटल शाळेकरीता एलईडी टीव्हीची आवश्यकता असते यासाठी सर्व शिक्षकांनी सातत्याने ग्रामपंचायतीशी संपर्क साधून प्रयत्न सुरु केले होते. शाळेचे मुख्याध्यापक मनोज खोकले , विलास चिकुर्डेकर ,जानकर , सुधाकर संग्रामे , विलास मेंडके व संतोष राठोड  व सुनील साळवे  यांनी व कन्नड शाळेचे मुख्याध्यापक माळी  व गद्दाळ  यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.डिजिटल टिव्ही संच शाळेला देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अध्यक्ष, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने हजर होते.