अखेर पोलीस उपनिरीक्षकपदी १५४ कर्मचारी रुजू

0
13

गोंदिया,दि.01 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ जून २०१६ ला परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर पात्र उमेदवारांनी ९ महिन्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकडेमी नाशिक येथे घेतले. मात्र त्यांना गृहविभागाकडून नियुक्ती आदेश देण्यास विलंब केला जात होता. उपनिरीक्षकांनी ही बाब आ.फुके यांच्या निदर्शनास आणून दिली. फुके यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर फडणवीस यांनी या १५४ पोलीस उपनिरीक्षकांना नियुक्ती देण्याचे देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे हे सर्व पोलीस निरीक्षक सेवेत रूजू झाले आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ जून २०१६ ला परीक्षा घेऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर पात्र उमेदवारांनी ९ महिन्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकेडमी नाशिक येथे घेतले.परंतु मॅट कोर्टाच्या आदेशाने प्रोबेशन थांबविण्यात आले होते.

१२ आॅक्टोबर २०१८ ला मॅटने पोलीस उपनिरीक्षकांना सरळ सेवेद्वारे नियुक्ती दिली. मंत्रिमंडळाने १५४ कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला असे सांगण्यात आले. त्यानंतर मॅटने कर्मचाºयांच्या बाजूने निर्णय दिला. परंतु गृह विभागाकडून नियुक्ती देण्यासंदर्भात दिरंगाईमुळे केली जात होती. ही बाब पोलीस उपनिरीक्षकांनी आ. फुके यांच्या निदर्शनास आणून दिली.फुके यांनी पोलीस उपनिरीक्षकांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून गृह विभागाकडून नियुक्ती संदर्भात होत असलेल्या दिंरगाईबाबत चर्चा केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहविभागाला सर्व १५४ पोलीस उपनिरीक्षकांना नियुक्ती आदेश देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सर्व १५४ कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाले. याबद्दल त्यांनी फुके यांची भेट घेऊन त्यांचे व मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.