फुलचूर-फुलचुरटोलाला लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा

0
10

गोंदिया : शहरालगत असलेल्या फुलचूर-फुलचुरटोला गावाला शहरासारख्याच सुविधा उपलब्ध करुन देऊन विकास करण्याचा आपला मानस आहे. ज्याप्रमाणे काँग्रेस सरकारच्या काळात कुडवा-कंटगी या गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. तशीच योजना फुलचूर-फुलचुरटोला या गावासाठी मंजूर करुन शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले.
पाठक कॉलनी फुलचुरटोला ते आंबाटोली फुलचूर रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, पं. स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, माजी सभापती स्रेहा गौतम, योगराज उपराडे, सरपंच पुष्पलता मेश्राम, उपरसंपच जीवन बन्सोड, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, माजी सरपंच उर्मिला दहीकर, श्याम कावळे, इंदिरा कटरे, दिनेश तिडके, गंगाराम बावनकर, राजा बैस, रवी बोदानी, निशा उईके, अर्चना राऊत, उपमा पशिने, अशोक लिचडे, अशोक ईटानकर, मनिष गौतम, देवचंद बिसेन, दुर्गाप्रसाद नागपुरे, सुनिता सव्वालाखे, सत्यभामा कवास, राजेश कटरे उपस्थित होते.
अग्रवाल म्हणाले फुलचूर परिसरात तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू झाल्याने जिल्हाभरातील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येत आहे. यामुळे परिसरातील उद्योगाला चालना मिळण्यास मदत झाली. भविष्यात तंत्रनिकेतन महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करुन विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले. सीमा मडावी म्हणाल्या फुलचूर-फुलचुरटोला परिसराचा झालेला विकास हे आ. अग्रवाल यांच्याच प्रयत्नांचे प्रतीक आहे.
तंत्रनिकेतन महाविद्यालय व बायपास मार्ग तयार करुन या परिसराचा चेहरा मोहरा बदलविण्याचे काम त्यांनी केल्याचे सांगितले. आ. अग्रवाल यांच्या माध्यमातून या परिसरात विविध कामे करण्यात आल्याने नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यास मदत झाली. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती सुध्दा याच गावातून करुन अग्रवाल यांनी या गावाचे महत्त्व वाढविल्याचे सांगितले.

नाथजोगी कुटुंबीयांना मिळणार घरकुल

तालुक्यातील ग्राम तांडा येथील नाथजोगी वसाहतीच्या विकासासाठी राज्य शासनाने ८८ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच या वसाहतीतील २० कुटूंबांना घरकुल मंजूर केले आहे.त्यामुळे अनेक वर्षांनंतर नाथजोगी वसाहतीतील नागरिकांची समस्या मार्गी लागल्याने त्यांच्या चेहऱ्यांवर समाधानाचे भाग्य झळकले.राज्य सरकारने २८ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत वसाहतीच्या विकासासाठी ८८ लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून २० नाथजोगी कुटुंबांना घरकुल तयार करुन देण्यात येणार आहे. तसेच समाजभवन, पाणी पुरवठा योजना, सिमेंट रोड, विद्युत व्यवस्था आदी कामे करण्यात येणार आहे.
शासनाने पहिल्या टप्प्यात २० घरकुल बांधकामांना मंजुरी दिली असून दुसºया टप्प्यात उर्वरित कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. तांडा येथील नाथजोगी वसाहतीत मागील अनेक वर्षांपासून पायाभूत सोयी सुविधांचा अभाव होता. याचीच दखल आ.अग्रवाल यांनी त्यांच्या वसाहतीत पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचीच दखल घेत शासनाने हा निधी मंजूर केला आहे.
या वसाहतीतील कुटुंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत घरकुल, पाणी पुरवठ्याची सुविधा, वीज, पक्के रस्ते आधी सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. घरकुलाचा लाभ घेण्यासाठी नाथजोगी कुटुंबांना ५ गुंठे जमिनीची व्यवस्था करावी लागणार होती. मात्र ही अडचण दूर करण्यात यावी अशी मागणी अग्रवाल यांनी शासनाकडे केली होती.
अखेर ती अट सुध्दा रद्द करण्यात आली. यापुढेही नाथजोगी वसाहतीच्या विकासासाठी कठिबध्द राहणार असल्याचे आ.अग्रवाल यांनी सांगितले. नाथजोगी वसाहतीसाठी व घरकुलासाठी निधी मंजूर करुन दिल्याबद्दल आमदार गोपालदास अग्रवाल  यांचे संतोष तांबू, सरपंच रविंद्र पंधरे व निर्मला बहेकार, रोहीणी रहांगडाले, विठोबा लिल्हारे, रामसिंह परिहार, भास्कर रहांगडाले, उत्तम खांडेकर यांनी आभार मानले.