देवरीच्या बीआरसीमध्ये चोरट्यांनी पुन्हा हात साफ केले

0
7

गेल्या जून महिन्यात सुद्धा सुमारे 40 हजारांचे साहित्य चोरले होते

 
देवरी,दि.1- देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गटसाधन केंद्रामध्ये काल शुक्रवारी (दि.30) च्या रात्री चोरट्यांनी पुन्हा आपले हात साफ केले. यावेळी चोरट्यांना सुमारे 56 हजाराचे साहित्य लंपास केले. दरम्यान गेल्या जून महिन्याच्या 4 तारखेला झालेल्या चोरीचा उलघडा अद्यापही देवरी पोलिसांना करता आला नाही, हे विशेष.
सविस्तर असे की, देवरी चिचगड या वर्दळीच्या रस्त्यावर शिक्षणविभागाचे गटसाधन केंद्र आहे. शेजारीच शासकीय गोदाम सुद्धा आहे. या कार्यालयाचे मागचे दार तोडून चोरट्यांनी एलजी कंपनीचे टीवी, एक संगणकाचे सीपीयू, डीटीएचचे बाक्स आणि कीबोर्ड-माऊस असे सुमारे 56 हजाराचे साहित्य चोरून नेले. यापूर्वी गेल्या 4 जून रोजी सुद्धा संगणक, मोनिटर असे 40 हजाराचे साहित्या चोरट्यांना पळवून नेले होते. या चोरीचा छळा लावण्यात अद्यापही देवरी पोलिसांना यश आले नाही. यामुळे चोरांची हिंमत वाढल्याचे वाढल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी देवरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार कमलेश बच्छाव यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.