धान खरेदी केंद्रावर बारद्यांनाच्या पुरवठा करा-काँग्रेस-राष्ट्रवादीचे निवेदन

0
8

सडक अर्जुनी,दि.०२ः- शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होवून महिनाभराचा कालावधी लोटत आहे. मात्र या केंद्रावर अद्यापही बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. परिणामी शेतकèयांना बाहेरुन अतिरिक्त दराने बारदाणा खरेदी करुन धान विक्री करावी लागत आहे. त्यामुळे आधीच नैसर्गिक संकटांना तोंड देत असलेल्या शेतकèयांना शासनाच्या वेळकाढू धोरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे सर्वच शासकीय धान खरेदी केंद्रावर त्वरीत बारदाणा उपलब्ध करुन देण्यात यावा.अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.कादबंरी बलकवडे यांना तसेच तालुका युवक काँग्रेसने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
शेतकèयांना व्यापाèयांकडून प्रति बारदाना १५ते २० रुपए दराने विकत घेण्याची पाळी आली आहे.याचा फायदा व्यापारी घेत असून अर्धे फाटलेले पोते बंडल मध्ये निघत असून खरेदी केलेल्या धाणाचा चूकाराही महिनो लोटून शेतकèयांचे खात्यात जमा झाले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची जाणिव करुन देण्यात आली आहे.यामुळे शेतकèयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावरील बारदाण्याचा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी दिलेल्या निवेदनातून दिला.जिल्हाधिकारी यांना निवेदन देतेवेळी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे,जि.प.गटनेते गंगाधर परशुरामकर,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.अविनाश काशीवार,जि.प.सदस्य रमेश चुèहे,महिला अध्यक्ष रजनी गिèहेपुंजे,किसान सभा महासचिव एफ आर टी शहा,इंदु परशुरामकर,मंजु डोगंरवार,पुष्पमाला बडोले उपस्थित होते.
तर तहसिलदारांना निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष निशांत राऊत, जिल्हा महासचिव अमित राऊत, बांधकाम सभापती रेहान शेख, महेश सोनवाने, विकास डोंगरे, संदीप शहारे, संतोष भंडारी, प्रशांत वैद्य, निकेश उके, नूतन बारसागडे, महेंद्र वंजारी, सुशील बडोले, विस्मय बडोले, सतिश कटरे, संतो भंडारी, कैलास उईके, लोकेश वंजारी, सिद्धार्थ राऊत, शरद नागपुरे, प्रज्वल लांजेवार, राजा पठाण, भरत मेंढे व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.