3 डिसेंबर रोजी अपंग दिनानिमित्त विविध कार्यकामांचे आयोजन

0
13

गोंदिया:- 3 डिसेंबर रोजी अपंग दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तिही समाजाचा अभिन्न अंग आहे. समाजातील प्रत्येक घटकात त्यांचे समायोजन व्हावे म्हणुन निवडणूक प्रक्रियेत त्यांचा महत्वाचा सहभाग नोंदविण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह गोंदिया येथे 3 डिसेंबर रोजी दुपारी 1 .00 वा अपंग दिनाचे औचित्यसाधून कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देश्याने भारत निवडणूक आयोगाने “सुलभ निवडणूका”(Accessible Election)  हे घोष वाक्य जाहिर  केले आहे. त्यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये समावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणयात येत आहेत. या कार्यक्रमात अपंग मतदारांना निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देऊन त्यांचे सत्कार करण्यात येईल. तसेच शासनाचे विविध योजनेंची विस्तृत माहिती देखील देण्यात येईल.
दिनांक 3 डिसेंबर रोजी समाज कल्याण विभाग गोंदिया, जिल्हा परिषद गोंदिया, दिव्यांग शासनमान्य विशेष शाळा/कर्मशाळा तथा निवडणूक विभाग तर्फे जागतिक अपंग  दिनाचे औचित्य साधून 3 डिसेंबर रोजी इंदिरा गांधी स्टेडीयम येथून सकाळी 9.00 वा रॅली काढण्यात येईल. तसेच सकाळी 10.00 वा. पोलिस मुख्यालय मैदान कारंजा येथे क्रिडा स्पार्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात येईल.