मुख्य बातम्या:
लमाणतांडा येथे जय सेवालाल महाराज जयंती साजरी# #पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम विदर्भात

4 डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून प्रारंभ

मुंबई दि.0२ः-गेल्या साडेचार वर्षात केंद्रातील व राज्यातील भाजप शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. देशात अग्रेसर असणा-या महाराष्ट्राची गेल्या चार वर्षात मोठी पिछेहाट झाली आहे. राज्यात १७ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाला भाव नाही. महिलांवरील अत्याचाराच मोठी वाढ झाली आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय मात्र सरकार काहीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढली आहे. या यात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात सुरुवात ४ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून होणार असून ही यात्रा पश्चिम विदर्भातील यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांतून प्रवास करून ९ डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे विराट जाहीर सभेने या यात्रेचा समारोप होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, विधान सभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चारूलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते व प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.

जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याचा कार्यक्रम

दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वा. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन घेवून यात्रेचा प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी 11.30 ते 1.30 वा. यतवमाळ येथे जाहीर सभा, सायं. 4.30 ते 6 वा. धामणगांव येथे जाहीर सभा, सायं. 7 ते 8.30 वा. आर्वी येथे जाहीर सभा होणार आहे.

दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते 12 वा. मोर्शी येथे जाहीर सभा, दुपारी 2 ते 3.30 वा. चांदूर बाजार येथे जाहीर सभा, सायं. 4.30 ते 6 वा. वळगांव येथे जाहीर सभा, सायं. 6.30 ते 9.30 वा. अमरावती येथे जाहीर सभा होणार आहे.

दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते 12 वा. दर्यापूर येथे जाहीर सभा, दुपारी 1.30 ते 1.45 वा. मुर्तिजापूर येथे स्वागत, दुपारी 2.30 ते 4 वा. कारंजा येथे जाहीर सभा, सायं. 5 ते 7 वा. वाशिम येथे जाहीर सभा होणार आहे.

दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते 12 वा. रिसोड येथे जाहीर सभा, दुपारी 3 ते 5 वा. अकोला येथे जाहीर सभा, सायं. 6 ते 8 वा. बाळापूर येथे जाहीर सभा, रात्री 8.30 ते 10 वा. शेगांव येथे दर्शन.

दि. 8 डिसेंबर रोजी दुपारी 11 ते 12.30 वा. अकोट येथे जाहीर सभा, दु. 3 ते 4.30 वरवट बकाल येथे जाहीर सभा, सायं. 6 ते 8 वा. खामगांव येथे जाहीर सभा होणार आहे.

दि. 9 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 2 वा. चिखली येथे अमरावती विभाग जनसंघर्ष यात्रेचा सांगता समारोप होईल.

Share